सोलापूरमध्ये पाच लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा
By रवींद्र देशमुख | Updated: July 13, 2023 16:56 IST2023-07-13T16:55:53+5:302023-07-13T16:56:34+5:30
हुंडा म्हणून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूरमध्ये पाच लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा
सोलापूर : हुंडा म्हणून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कविता सचिन बडगंची (वय २३, रा. नवनाथनगर, जुना कुंभारी नाका) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कविता यांना पाच लाख रुपये माहेरून आण असे म्हणत मारहाण, शिवीगाळ करत होते. शिवाय मारहाण करत त्यांना मानिसक त्रास दिला. याप्रकरणी कविता बडगंची यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सचिन बडगंची, सासू लता बडगंची, सासरे अशोक बडगंची, नवीन मेरगू ( सर्व रा. जुना विडी घरकुल, हैदराबाद रोड) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस नाईक कटके करत आहेत. ही घटना २०२१ ते मे २०२३ दरम्यान घडली.