कामावरून काढलेल्या सोलापुरातील डॉक्टरांना पुन्हा घेतले; ४० वरून ३० हजार वेतन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 17:38 IST2021-06-30T17:37:13+5:302021-06-30T17:38:17+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Took back the fired doctors from Solapur; Salary increased from 40 to 30 thousand | कामावरून काढलेल्या सोलापुरातील डॉक्टरांना पुन्हा घेतले; ४० वरून ३० हजार वेतन केले

कामावरून काढलेल्या सोलापुरातील डॉक्टरांना पुन्हा घेतले; ४० वरून ३० हजार वेतन केले

सोलापूर -  सोलापूर महानगरपालिकेच्या कोविड19 मध्ये काम करणाऱ्या 30 डॉक्टरांना आयुक्त पि. शिवशंकर यांनी कामावरून कमी केले होते. ते सर्व डॉक्टर आज महापौर श्रीकांचना यन्नम यांची भेट घेऊन पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात निवेदन दिले.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी तातडीने आयुक्तांशी चर्चा करून या 30 डॉक्टरांना परत कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी या डॉक्टरांना 40 हजार वेतन देण्यात येत होते. पण आयुक्त व महापौरांनी  चर्चा केल्यानंतर 30 हजार वेतन देण्याचे ठरले व त्यांना कामावर घेण्याचे ठरले. यावेळी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सभागृह नेते शिवानंद पाटील, आयुक्त पि. शिवशंकर, गटनेते आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व डॉक्टरांनी महापौर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. 

Web Title: Took back the fired doctors from Solapur; Salary increased from 40 to 30 thousand