आज माघ वारी; पंढरपुरात ‘विठूनामाचा गजर’, दोन लाख भाविकांची मांदियाळी

By Appasaheb.patil | Published: February 16, 2019 09:13 AM2019-02-16T09:13:01+5:302019-02-16T09:17:13+5:30

पंढरपूर : माघ वारी (जया एकादशी) असल्याने विठूरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून दोन लाखांपेक्षा अधिक ...

Today Magh Vari; Panditpur 'Vitunamachar Alangar' of two lakh pilgrims | आज माघ वारी; पंढरपुरात ‘विठूनामाचा गजर’, दोन लाख भाविकांची मांदियाळी

आज माघ वारी; पंढरपुरात ‘विठूनामाचा गजर’, दोन लाख भाविकांची मांदियाळी

googlenewsNext
ठळक मुद्देश्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्राशेडपर्यंत गेलीदर्शनासाठी भाविकांना १० ते १५ तास लागत असल्याचे दिसून येते. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल

पंढरपूर : माघ वारी (जया एकादशी) असल्याने विठूरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून दोन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले आहेत. भाविक आतुर झाले आहेत़ माघ वारीनिमित्त मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवाय विठूरायाला फुलाची आरास करण्यात आली आहे़
श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्राशेडपर्यंत गेली आहे़ दर्शनासाठी भाविकांना १० ते १५ तास लागत असल्याचे दिसून येते.

पंढरपुरात आषाढी, कार्तिकीनंतर माघ वारी असते़ या वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. 

डोक्यावर, काखेला किंवा पाठीला अडकविलेली बॅग़, थंडी वाजू नये म्हणून डोक्याला मफलर किंवा रुमाल बांधलेला़़़ हाती भगवा झेंडा घेऊऩ़़ मुखी विठूनामाचा जयघोष करीत़़़ झपाझपा पावले टाकत अनेक चिमुकल्यांसह महिला, पुरुष मंदिराच्या दिशेने निघाले होते़ त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यांसह अन्य मठातही भाविकांची वर्दळ होती़ जे भाविक दाखल झाले ते मात्र मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, कीर्तनात रंगले होते.

शिवाय काही भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेकडे जात होते़ मात्र दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत गेली असून, पदस्पर्श दर्शनासाठी १० ते १५ तास लागतात़ 

व्यावसायिकांनी थाटली दुकाने...

  • - यात्रेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, ६५ एकर परिसरातील सोलापूर रस्ता येथे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यात प्रासादिक वस्तू, फोटो फे्रम, देवदेवतांच्या तांब्या-पितळीच्या मूर्ती, तुळशीच्या माळा, विविध धार्मिक ग्रंथ, सीडी, कॅसेटचा समावेश आहे.

वारीतील सोयीसुविधा...

  • - पददर्शनासाठी गोपाळपूरपर्यंत दर्शन रांगेची सोय केली असली तरी भाविकांची रांग पत्राशेडपर्यंतच आहे़
  • - दर्शन रांगेतील भाविकांसाठी स्वयंसेवी संस्थेतर्फे मोफत चहा-पाण्याची सोय
  • च्दर्शन रांगेत होणारी घुसखोरी, चोरी रोखण्यासाठी २४ तास चोख पोलीस बंदोबस्त
  • - सीसीटीव्ही कॅमेºयातून संपूर्ण वारीवर नजर
  • - ६५ एकर क्षेत्रावर वारकºयांसाठी पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतागृह, औषधोपचार, १०८ क्रमांकाची अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, पोलीस बंदोबस्ताची सोय
  • - पंढरपूर शहरात येणाºया विविध मार्गांवर बॅरिकेड उभारून जड वाहनांना बंदी

Web Title: Today Magh Vari; Panditpur 'Vitunamachar Alangar' of two lakh pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.