शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे सुटायच्या अर्धा तास अगोदरपर्यंत तिकीटाची माहिती मिळणार

By appasaheb.patil | Updated: October 16, 2020 16:25 IST

दोन वेळा निघणार आरक्षण चार्ट; प्रवाशांना मिळणार दिलासा

ठळक मुद्दे प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी (रिझर्व्हेशन चार्ट) आता आॅनलाइन पाहता येणारएखाद्या गाडीचा पहिले आरक्षण चार्ट अडीच तासापुर्वी तयार होत होतेप्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्यास तसा बदल दुसºया यादीत झालेला दिसणार

सोलापूर : भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे़ आता रेल्वे गाडी सुटण्यापुर्वी अर्धा तासापर्यंत प्रवासी आपले तिकीट बुक करून सीट कन्फम करू शकणार आहेत़ कारण रेल्वेने आता एकवेळ नव्हे तर अडीच तासाच्या फरकाने दोनवेळा आरक्षण चार्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

लांब पल्ल्याच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास केला जातो. अनेकदा प्रवासाला निघण्यापूर्वी तिकीट आरक्षणाबाबत प्रवासी धास्तावलेले असतात. प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म होईल का, याची चिंता प्रवाशांना नेहमी सतावते. अनेकदा तिकीट कन्फर्म होत नाही. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, रेल्वे प्रशासनाने यावर उपाय शोधून काढला असून, रिझर्व्हेशन चार्ट तयार झाला तरी, प्रवासी कन्फर्म तिकीट मिळवू शकतात. कारण आता रेल्वे सुटायच्या अर्धा तास अगोदरपर्यंत प्रवासी आपले तिकीट कन्फम करून सीट मिळवू शकतात़ पुर्वी अडीच तासापुर्वी बनविला जाणारा आरक्षण चार्ट आता रेल्वे सुटण्याअगोदर अर्धा तास अगोदरही बनविण्यात येणार आहे़ त्यामुळे तिकीट वेटिंगचे प्रमाण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.----------तिकीटातला बदल अर्धा तासात दिसेलएखाद्या गाडीचा पहिले आरक्षण चार्ट अडीच तासापुर्वी तयार होत होते़ त्यानंतर तिकीट रद्द करणाºया प्रवाशांची माहिती आरक्षण चार्टमध्ये दिसून येत नव्हती़ आता नव्या नियमांनुसार रेल्वे सुटायच्या अर्धा तास अगोदरपर्यंत प्रवाशांना आपले तिकीट कन्फम झाले की नाही हे समजणार आहे़  या कालावधीत प्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्यास तसा बदल दुसºया यादीत झालेला दिसणार असल्याचे रेल्वेने सांगितले़ ----------आरक्षण यादी आॅनलाइन पाहता येणार प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी (रिझर्व्हेशन चार्ट) आता आॅनलाइन पाहता येणार आहे. यामुळे एखाद्या गाडीची आरक्षण यादी तयार झाल्यानंतरही त्या गाडीतील रिकाम्या जागा, आरक्षित केलेल्या जागा आणि अंशत: आरक्षित जागांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले़ पूर्वी हिच माहिती १३९ या टोल फ्री वरुन एसएमएसद्वारे मिळायची आता आॅनलाईनमुळे आणखी पारदर्शी आला आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे