शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

तिबेटियन विक्रेत्यांचा व्यवसाय प्रारंभ लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 8:58 PM

सोलापुरातील रेनकोट, स्वेटर विक्रीची दुकाने बंद; महापालिकेकडे रस्ता लवकर सुरु करण्याची मागणी

ठळक मुद्देसोलापूर शहरातील पार्क चौक येथून सिध्देश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्यात येत आहेयंदा रस्ता दुरुस्त करण्यात येत असल्याने येथे दुकान सुरु करायला आणखी वेळ लागण्याची शक्यतातिबेटी निर्वासितांना रस्ता दुरुस्त होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार

सोलापूर : शहरातील पार्क चौक येथून सिध्देश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक तिबेटी निर्वासित कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. यंदा रस्ता दुरुस्त करण्यात येत असल्याने येथे दुकान सुरु करायला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे तिबेटी निर्वासितांना रस्ता दुरुस्त होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पार्क चौक येथे तिबेटी निर्वासितांची दुकाने जून महिण्यात सुरु होत असतात. जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असल्याने येथे रेनकोटची विक्री होत असते. पावसाळा झाल्यानंतर थंडी सुरु होते. त्यावेळी या दुकानातून स्वेटर विकली जातात. शहरात इतर ठिकाणी मिळणाºया रेनकोट व स्वेटरच्या तुलनेने तिबेटी दुकानकारांकडे स्वस्त मिळतात. यामुळे सोलापूरकर इतर दुकानांपेक्षा तिबेटी निर्वासितांच्या दुकानातून खरेदी करण्याला प्राधान्य देतात.

पार्क चौक येथील दुकानात रेनकोट २५० रुपये ते ५०० रुपये दरम्यान मिळतात. जसे कपडे विकले जातील तसे दुकानासाठी पुन्हा माल घेत असल्याच एका व्यवसाइकाने सांगितले. तसेच महापालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम लवकर संपवावे यासाठी महापालिका आयुक्तांना भेटून विनंती केली असल्याचे एका तिबेटी निर्वासिताने सांगितले.

हुबळी येथे तिबेटी निर्वासितांची छावणी - तिबेटी निर्वासित हे कर्नाटकातील हुबळी येथील छावणीत राहतात. व्यवसायानिमित्त ते वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. असेच काही तिबेटी निर्वासित सोलापुरात व्यवसायानिमित्त रहात आहेत. दरवर्षीप्रमाणे काही तिबेटी निर्वासित हे हुुबळी येथील छावणीमधून व्यवसायासाठी सोलापुरात दाखल झाले. मात्र, त्यांच्या दुकानासमोर रस्त्याचे काम सुरु असल्याने ते चिंतीत होते. त्यातील बहुतांश जण हे आपल्या गावाकडे परत गेले आहेत.

जेसीबी चालकाकडे चौकशी- हुबळी येथून सोलापुरात आल्यावर काही तिबेटी निर्वासितांनी आपल्या दुकानाकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांना रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे दिसल्यावर त्यांनी जेसीबी चालकाकडे काम कधी संपणार याची चौकशी केली. यानंतर जेसीबी चालकाने लवकरच काम संपेल असे सांगितले. असेच काम करत राहा म्हणजे लवकर रस्ता सुरु होईल अशी अपेक्षी तिबेटी निर्वासिताने जेसीबी चालकाकाकडे व्यक्त केली.

मे महिण्याच्या शेवटी किंवा जून महिण्याच्या सुरुवातीला आमच्या दुकानाची सुरुवात होते. यंदा पार्क चौक परिसरात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याने दुकान सुरु करण्यास उशीर होईल. प्रशासनाने रस्ता दुरुस्त करण्याचे चांगले काम हाती घेतले आहे. शहराच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. हे काम लवकर झाल्यास आम्हाला दुकान सुरु करता येणार आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.  - टेनझीन, स्वेटर-रेनकोट विक्रेता, पार्क चौक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाbusinessव्यवसायRainपाऊस