टेभुर्णी- अहमदनगर महामार्गावर तीन ऊसतोड कामगार जखमी
By दिपक दुपारगुडे | Updated: February 24, 2024 19:34 IST2024-02-24T19:34:24+5:302024-02-24T19:34:56+5:30
जखमी महिलेला सोलापूर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.

टेभुर्णी- अहमदनगर महामार्गावर तीन ऊसतोड कामगार जखमी
सोलापूर : टेभुर्णी- अहमदनगर महामार्गावर मांगी स्टँडवर एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील उत्तर वडगाव येथील तिघे ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत.
जखमी महिलेला सोलापूर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे. तर एका चिमुकल्याला करमाळ्यात खासगी रुग्णालयात व एकावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रस्त्यावर शुक्रवारी ट्रकचा अपघात झाला होता. त्यानंतर आज पुन्हा हा अपघात झाला आहे. जखमींमध्ये कामगारांच्या लहान मुलांचा समावेश आहे.
सोलापूर येथून नाशिकला एसटी बस जात होती. तर अपघातातील जखमी हे दुचाकीवरून पोथरेकडे ऊसतोडणीसाठी जात होते. सोनाली पांडुरंग शिंदे (वय ३२), पांडुरंग बबन शिंदे (वय ३२) व गजानन पांडुरंग शिंदे (वय १२) अशी यातील जखमींची नावे आहेत.