प्रजासत्ताक दिनी मुंबईतील संचालनासाठी तिघांची तर दिल्लीसाठी एकाची निवड

By बाळकृष्ण परब | Updated: January 16, 2023 17:13 IST2023-01-16T17:13:03+5:302023-01-16T17:13:42+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तीन विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबईत होणाऱ्या संचालनासाठी (परेड) आणि एका विद्यार्थ्याची दिल्लीत होणाऱ्या संचालनासाठी निवड झाली आहे. 

Three selected for operation in Mumbai and one for Delhi on Republic Day | प्रजासत्ताक दिनी मुंबईतील संचालनासाठी तिघांची तर दिल्लीसाठी एकाची निवड

प्रजासत्ताक दिनी मुंबईतील संचालनासाठी तिघांची तर दिल्लीसाठी एकाची निवड

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तीन विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबईत होणाऱ्या संचालनासाठी (परेड) आणि एका विद्यार्थ्याची दिल्लीत होणाऱ्या संचालनासाठी निवड झाली आहे. 

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत ही निवड करण्यात आली आहे. मुंबईसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगमेश्वर कॉलेजमधील नागवेणी स्वामी आणि प्रतिभा बगले यांचा तर वालचंद कॉलेजचा सोहेल पटेल या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तर दिल्लीतील संचालनासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचा विद्यार्थी सत्यजीत चव्हाण याची निवड झाली आहे. त्याची निवड ही २० ते २९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान गुजरात येथे झालेल्या सराव शिबिरातून झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी मुंबई आणि दिल्लीला सरावासाठी रवाना झाले आहेत.

Web Title: Three selected for operation in Mumbai and one for Delhi on Republic Day