सोलापुरात पुन्हा आढळले तीन पॉझिटिव्ह; हॉटस्पॉटचीही संख्या वाढली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 07:19 PM2020-04-22T19:19:47+5:302020-04-22T19:25:01+5:30

सोलापुरातील संख्या झाली ३३; नई जिंदगी परिसरातील शिवगंगा नगरही झाले सील...

Three positives found again in Solapur; The number of hotspots also increased ...! | सोलापुरात पुन्हा आढळले तीन पॉझिटिव्ह; हॉटस्पॉटचीही संख्या वाढली...!

सोलापुरात पुन्हा आढळले तीन पॉझिटिव्ह; हॉटस्पॉटचीही संख्या वाढली...!

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्ण वाढलेसोलापूर जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढलेआरोग्य विभाग झाला अधिक सतर्क

सोलापूर : सोलापुरात 'कोरोना' रुग्णांमध्ये वाढ होत चालली असून, बुधवारी आणखी तीन पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.


नव्याने आढळलेले रुग्ण कुमठा नाका येथील भारतरत्न इंदिरा नगरातील दोन आहेत. येथील एका वृद्धेचा कोरोणामुळे मृत्यू झाला होता. त्या वृद्धेच्या संपर्काताील लोकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नमुने घेतले असता दोघांचा अहवाल पॉझाीटीव्ह आला आहे. त्याचबरोबर नईजिंदगी येथील शिवगंगानगरात राहणारी महिला आजाराने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नमुने प्रयोग शाळेत तपासले असता, ती कोरोणा पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सोलापुरात आता कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 33 झाली असून, यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ३0 जणांवर उपचार सुरू आहेत.                          
हॉटस्पॉट वाढत आहेत
सोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसून आले आहे. आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट झाले आहेत. यामध्ये मंगळवारी मोदीखाना, शास्त्रीनगर व मदरइंडिया झोपडपट्टी सील करण्यात आली. तेथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी शिवगंगानगरातील महिला पॉझीटीव्ह आढळल्याने आता हा भाग देखील सील करण्यात आला आहे. सोलापुरात कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदीचा अंमल आणखीन कडक करण्यात येत आहे. लोकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

Web Title: Three positives found again in Solapur; The number of hotspots also increased ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.