धक्कादायक! तिन्हीही मुलीच झाल्याने ‘तिला’ दीड वर्षे खोलीत कोंडलं; मुलींनाही डांबलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 08:56 IST2021-06-03T08:54:57+5:302021-06-03T08:56:50+5:30

पंढरपुरातील घटना: पोलिसांनी तीन मुलींसह महिलेची केली सुटका; पतीला अटक

three girls and mother were kept locked up for a year and a half in solapur | धक्कादायक! तिन्हीही मुलीच झाल्याने ‘तिला’ दीड वर्षे खोलीत कोंडलं; मुलींनाही डांबलं

धक्कादायक! तिन्हीही मुलीच झाल्याने ‘तिला’ दीड वर्षे खोलीत कोंडलं; मुलींनाही डांबलं

पंढरपूर : वंशाला दिवाच हवा यासाठी हट्टाला पेटलेल्या इसमाने आपल्या पत्नीसह तीन मुलींना चक्क दीड वर्ष डांबून अमानुष छळ केल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला असून पोलिसांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी दत्तात्रय कृष्णा बरडे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) याला अटक करण्यात आली आहे. 

पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली, मारुती बुवा कराडकर महाराज मठासमोरील एका घरात एका महिलेसह ३ मुलींना गेल्या दीड वर्षापासून डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी साध्या वेशात त्या घरात गेले. त्यावेळी ती महिला अत्यंत घाबरलेल्या स्थितीत खोलीमध्ये कोपऱ्यात बसलेली दिसून आली. महिलेला विचारपूस केली असता मला मुलगा झाला नाही, तीन मुलीच झाल्या आहेत. म्हणून मला घरामध्ये कोंडून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. 

Web Title: three girls and mother were kept locked up for a year and a half in solapur