तेरा वर्षाच्या मुलीचे शाळेतून फूस लाऊन केले अपहरण, वडिलांची तक्रार
By विलास जळकोटकर | Updated: March 5, 2024 16:31 IST2024-03-05T16:30:49+5:302024-03-05T16:31:52+5:30
गावातून शाळेत आली ती परतलीच नाही

तेरा वर्षाच्या मुलीचे शाळेतून फूस लाऊन केले अपहरण, वडिलांची तक्रार
सोलापूर : परगावहून शाळेला येणाऱ्या मुलीला शाळेच्या आवारातून फूस लाऊन पळवून नेण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. शहरातील एका शाळेत दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान ही घटना घडल्याचे पित्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यातील १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी शहराजवळच्या गावातून दररोज शाळेला येते. सोमवारी ती नेहमीप्रमाणे गावातून शाळेला आली. शाळा सुटल्यानंतर मुलगी गावाकडे परतली नाही यामुळे सारेच चिंतित झाले. आजूबाजूच्या ओळखीच्या व नातलगांकडे गेली आहे याचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
अखेर तिच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. रितसर तक्रार नोंदवून शाळेच्या आवारातून कोणीतही आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदला असून, तपास महिला फौजदार सुतार करीत आहेत.