चोराला अटक, पाच लाखाचे दागिने जप्त
By रूपेश हेळवे | Updated: August 2, 2023 14:51 IST2023-08-02T14:51:17+5:302023-08-02T14:51:33+5:30
ही कामगिरी फौजदार चावडीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

चोराला अटक, पाच लाखाचे दागिने जप्त
रुपेश हेळवे, सोलापूर : घरातील सफाईसाठी ये जा करणार्या कामगारानेच दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी यतिराज गायकवाड ( वय २५, रा. मुरारजी पेठ) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १२ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी फौजदार चावडीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
फिर्यादी मस्के, यांच्या घरातील दागिने चोरीला गेल्याबाबत त्यांनी २५ जुन रोजी फिर्याद दिली होती. याप्रकरणी तपास करताना २६ जुलै रोजी पोलिसांना एक संशयीत आरोपी चोरीतील दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी आरोपी यतिराज गायकवाड याला ताब्यात घेतले. तेव्हा पंचासमक्ष त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ दागिने आढळले. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याच्याकडून ४ लाख ७६ हजारांचे १२ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.