शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल नाही म्हणून श्रमिकांच्या वस्तीत गणितानं रंगताहेत ३०० घरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:10 IST

पूर्व भागातील नवा प्रयोग; रंगलेल्या भिंतीवरून विद्यार्थी गिरवू लागले आता धडे

ठळक मुद्देनीलमनगर परिसरातील बहुतांश विद्यार्थी गरीब आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीतअभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत, याकरिता आम्ही अभ्यासक्रम त्यांच्या दारापर्यंत नेला आहेविशेष म्हणजे विद्यार्थी मोठ्या कुतूहलातून अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. पालक समाधानी आहेत

सोलापूर : श्रमिक वस्त्यांमधील हजारो विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. शाळेतील शिक्षकांनाही आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पूर्व भागातील आशा मराठी विद्यालयातील शिक्षकांनी शाळेचा अभ्यासक्रम गरीब विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतीवर रंगवला. तीनशे घरांच्या भिंतींवर शालेय अभ्यासक्रम साकारला जाणार असून सध्या १८० घरांच्या भिंती रंगविल्या आहेतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. सरकारने आॅनलाईन शाळा भरवायला सांगितलं आहे. विद्यार्थी घरीच बसून आपल्या घराच्या भिंतीवरील अक्षर ओळख, गणितीय सूत्र, तसेच मराठी-इंग्रजी व्याकरण यांसह इतर शालेय अभ्यासक्रम पाठ करताहेत.  या अभिनव उपक्रमाचा इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होतोय.

नीलमनगर येथील आशा मराठी विद्यालयाकडून घरांच्या भिंतींवर शालेय अभ्यासक्रम रंगीबेरंगी पेंट्सद्वारे रंगविले जात आहे. आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणितीय आकडेमोड, भौगोलिय घडामोडी। विज्ञानातील प्रयोग, महापुरुषांची नावे, सामान्यज्ञान, गणिती कोडे,शब्दकोडे, स्वच्छतेचे संदेश, चांगल्या सवयी तसेच समाजाभिमुख घडामोडींच्या चित्रकृती तसेच चित्रकृती यांसह यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थी आवडीने त्यांना वेळ मिळेल तेव्हा भिंतींवरील अक्षरे वाचताहेत. जोरात पाठांतरही करताहेत. 

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हारुन पठाण तसेच शाळेतील शिक्षक राम गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका तसलीमबानो पठाण तसेच आफ्रिन सय्यद यांचेही मोलाचे सहकार्य आहे. याकरिता दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याकरिता शाळेतील शिक्षक तसेच शाळेतील आजी-माजी विद्यार्थी मदत करत आहेत, अशी माहिती शिक्षक राम गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.

नीलमनगर परिसरातील बहुतांश विद्यार्थी गरीब आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे असे गरीब विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत, याकरिता आम्ही अभ्यासक्रम त्यांच्या दारापर्यंत नेला आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसतोय. विशेष म्हणजे विद्यार्थी मोठ्या कुतूहलातून अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. पालक समाधानी आहेत. -तसलीमबानो पठाण, मुख्याध्यापिका- आशा मराठी विद्यालय.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या