सोलापुरात कॉलेजला गेलेली तरुणी घरी परतलीच नाही
By विलास जळकोटकर | Updated: January 17, 2024 18:21 IST2024-01-17T18:20:42+5:302024-01-17T18:21:08+5:30
आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली

सोलापुरात कॉलेजला गेलेली तरुणी घरी परतलीच नाही
सोलापूर : घरातून कॉलेजला जाते म्हणून गेलेली तरुणी रात्र लोटली तरी घरी परत आली नाही. आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार भा. दं. ३६३ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी मजरेवाडी परिसरात पत्नी, मुलगा, १७ वर्षांची मुलगी असे कुटुंबासह राहतात. दलालीचा त्यांचा व्यवसाय आहे. सोमवारी ते कामानिमित्त घराबाहेर होते. दुपारी घरी आले असताना त्यांनी मुलगी कोठे गेली आहे असे पत्नीला विचारणा केली. त्यावर पत्नीने कॉलेजला जाते म्हणून गेल्याचे सांगितले. सायंकाळचे सहा वाजले तरी ती परत न आल्याने फिर्यादी व पीडितेचा भाऊ यांनी कॉलेजमध्ये, नातलगांकडे चौकशी केली मात्र ती दिसून आली नाही.
सर्वजण काळजीत पडले. तिचा मोबाईलही बंद स्थितीत होता. अखेर मंगळवारी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.