गायीला का हात लावला, म्हणून तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 18:35 IST2023-10-27T18:35:27+5:302023-10-27T18:35:37+5:30
दोघांविरुद्ध गुन्हा : काठीने मारुन केले जखमी

गायीला का हात लावला, म्हणून तरुणाला मारहाण
सोलापूर: घरासमोर बांधलेल्या ‘आमच्या गायीला का हात लावला,’ असे म्हणत तरुणाला दोघांनी मिळून हाताने व काठीने मारहाण करून जखमी केले. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास भवानी पेठ परिसरात ही घटना घडली. किरणकुमार नरसिंग शिंदे (वय ३८, रा.भवानी पेठ, ढोर गल्ली, सोलापूर) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे, तर शिवकुमार नरसिंग शिंदे व रेणुका शिवकुमार शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
यातील फिर्यादी किरणकुमार व आरोपी शेजारी राहतात. गुरुवारी यातील आरोपींनी त्यांच्या घरासमोर गाय बांधली होती. त्या गायीला फिर्यादीने हात लावला. यावर चिडून दोघांनी मिळून गायीला का हात लावता, असे म्हणत शिव्या देऊन हाताने व काठीने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास हवालदार भोगशेट्टी करीत आहेत.