शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बचतीचा मंत्र... गाव राज्यात गाजलं अन् सोयाबीननं मिळवून दिला पुरस्कार

By विठ्ठल खेळगी | Updated: March 14, 2023 15:20 IST

पाऊस चांगला पडत असल्याने खरीप पेरणी व सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे

विठ्ठल खेळगी

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण सोयाबीन उत्पादक गटाने ठरविले अन् करूनही दाखविले आहे. एकत्रित बियाणे व खतांच्या खरेदीतून पैसे वाचविले, शिवाय टोकण यंत्राने पेरणी करून बियाण्यांची ५० टक्के बचत केली. अतिवृष्टी व संततधारेने जमिनीवर पाणी थांबले. मात्र, टोकण पद्धतीच्या लागवडीमुळे पिकांचे नुकसान टळल्याचे शेतकरी सांगतात. हाच संघ उत्तर तालुक्यात भारी ठरला असून, एक लाखाचे बक्षीस मिळविले आहे.उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादन उच्चांकी घेतल्याने पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. एक लाखाचे बक्षीस घेणाऱ्या कळमण सोयाबीन गटशेती गटाने उत्पादन खर्चातही मोठी बचत केली आहे. वडाळा, रानमसलेपासून उत्तर भागातील गावांची शेती ही पावसाळ्यावर अवलंबून. खरीप पेरणी योग्य पाऊस पडायचा नाही व डिसेंबरनंतर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून. ज्वारी काढणीसाठी गावातून पाणी शेतात घेऊन जावे लागायचे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांत पाऊसमान चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होत आहे.

पाऊस चांगला पडत असल्याने खरीप पेरणी व सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, खरीप हंगामात भरपूर पाऊस पडत आहे, त्यामुळे पिके पाण्यात खराब होत आहेत. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ टोकण यंत्राच्या साह्याने पेरणीला पसंती दिली आहे. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी गटातील शेतकऱ्यासाठी आवश्यक बियाण्यांची एकत्रित खरेदी केली. खत एकत्रित घेतले, शिवाय बीबीएफ यंत्राने पेरणी केली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली.

सोयाबीन विक्रीतून ३८ लाख रुपये

५५ एकरांसाठी ५५ पिशव्या बियाण्यांऐवजी टोकण यंत्रामुळे २९ पिशव्यांत पेरणी पूर्ण झाली. २६ पिशव्या बियाण्यांची बचत झाली. पिशव्या फोडून बियाण्यांचे वाटप केले. खताच्या सामूहिक खरेदीत १५०० रूपये खर्च कमी झाला. ५५ एकरात ७१२ क्विंटल सोयाबीन उत्पादन निघाले. विक्रीतून ३८ लाख ७२ हजार ५०२ रुपये आले. झालेला खर्च ५ लाख ८२ हजार ७७० रूपये वजा केल्यानंतर ३३ लाख १८ हजार ५६९ रूपये शिल्लक राहिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी