शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मंगळवेढ्यातील बहुचर्चित दोन दरोडयाचा उलघडा; दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 13:08 IST

अट्टल दरोडेखोराना  अटक करून ५ लाखाचे  १० तोळे सोने जप्त 

मंगळवेढा : मंगळवेढा  तालुक्यातील  बहुचर्चित दोन दरोडयाचा उलघडा लावण्यात पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमला यश आले आहे. यामध्ये दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद झाली असून या अट्टल दरोडेखोरांना अटक करून ५ लाखाचे १० तोळे सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गंगळवेढा पोलीस ठाणे हद्द्द्दित ७ ऑगस्ट २०२१ व २४ डिसेंबर २०२१ रोजी दोन दरोडे झाले होते. यातील पहिल्या घटनेमध्ये दामाजीनगर मधील सुवर्णा हजारे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडुन दरोडे खोरांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पतीला लोखंडी गजाने मारहाण करून, हात फॅक्चर करून १.५ तोळे वजनाचे सोने लुटुन नेले होते. तसेच यातील दुस-या घटनेमधील चैतन्य नगर, नागणेवाडी येथील मंदाकिनी सावजी यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश करून नव वधु दामपत्यांना ठार मारण्याची भिती घालून त्यांच्याकडुन एकुण ११ तोळे ३ ग्रॅम सोने लुटुल नेले होते.

मंगळवेढा शहरातील या पडलेल्या सलग दोन दरोडयामुळे मंगळवेढा शहरात भितीचे व असुरक्षतेची भावणा निर्माण झालेली होती. तसेच दोन्ही दरोडे उघडकीस आणने पोलीसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते. पोलीसांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून तांत्रीक पुराव्याचा आधार घेऊन आराेपींना अटक केली.  तसेच गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी असलेला निष्पन्न आरोपीलाही लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख  रूपये किंमतीचे १० तोळे सोने  जप्त करण्यात आले आहे.  यातील आरोपीतांनी यापूर्वी महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे अशाप्रकारे गुन्हे केल्याचे माहिती आहे. तसेच यातील आणखीन दोन निष्पन्न आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करून आणखीन गुन्हे उघडकीस येणार आहेत. या प्रकरणी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील दोन सराफाची चौकशी सुरू आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधिक्षक  तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिमत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील ,पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापु पिंगळे, अविनाश पाटील,  दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, सचिन बनकर, सुरज देशमुख, सोमनाथ माने,  उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दत्तात्रय तोंडले, सुनिल मोरे,  सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण कडील अन्वर आत्तार व तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील  खाजा मुजावर, नारायन गोलेकर यांनी कारवाई केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस