भाजप बडतर्फ जिल्हाध्यक्षावर आरोप करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!

By रवींद्र देशमुख | Updated: May 18, 2023 21:13 IST2023-05-18T14:59:10+5:302023-05-18T21:13:02+5:30

एरंडाच्या बिया खाऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न

The suicide attempt of the girlfriend of the sacked BJP district president by making the video viral | भाजप बडतर्फ जिल्हाध्यक्षावर आरोप करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!

भाजप बडतर्फ जिल्हाध्यक्षावर आरोप करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!

रवींद्र देशमुख, अरुण लिगाडे, सांगोला: भाजपचा बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्याकडून प्रतारणा झाल्याचा आरोप सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओद्वारे करून गुरुवारी दुपारी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी तिने एरंडाच्या बिया खाल्या. तिच्यावर सांगोला येथे उपचार करण्यात आले.
 आज सकाळी ही महिला  जवळा ता सांगोला येथील श्रीकांत देशमुख याच्या देशमुख वस्ती येथील घरापुढे येवून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तिने श्रीकांत देशमुख याच्या वडीलांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीकांतचा भाऊ लालासाहेब देशमुख यांनी तुमचा नवरा येथे रहात नाही, जिथे रहातो तिकडे जावा म्हणून हाकलून दिले.

त्यांनंतर तेथून  सांगोला पोलीस स्टेशनला येवून मी एरंडीच्या बियाणे खाल्ल्याचे तिने सांगितले. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तिला तात्काळ उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

प्रकृती स्थिर

महिलेने एरंडाच्या 40 बिया खाल्या त्यामुळे रक्तदाब वाढला असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला पुढील उपचारासाठी सोलापूरला आणले आहे.

Web Title: The suicide attempt of the girlfriend of the sacked BJP district president by making the video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.