पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात घुमला ‘जयभीम’चा नारा

By विलास जळकोटकर | Updated: April 18, 2023 15:36 IST2023-04-18T15:36:31+5:302023-04-18T15:36:41+5:30

होडीतून काढली डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक

The slogan of 'Jayabhim' echoed in the character of Chandrabhage in Pandhari | पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात घुमला ‘जयभीम’चा नारा

पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात घुमला ‘जयभीम’चा नारा

सोलापूर : पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेला सजवून होडीतून नदीपात्रात मिरवणूक काढून ‘जयभीम’ नारा देण्यात आला. महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवला. 

चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये आकर्षक पध्दतीची सजावट करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, अनोखे आभिवादन करण्यात आले. यावेळी जयभीम च्या जयघोषाने सबंध चंद्रभागेच्या वाळवंटाचा परिसर दणाणून गेला.

चंद्रभागेच्या पात्रामध्ये एका होडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा ठेऊन अभिवादन केले. व चंद्रभागेच्या पात्रातून नावेतून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व घोषणा देण्यात आली. 

या उपक्रमासाठी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब अधटराव, कुमार संगीतराव, सतीश नेहतराव, गणेश अंकुशराव नागनाथ इंगळे यांच्यासह कार्यकर्ते व समाज बांधवांनी पुढाकार घेतला.

 

Web Title: The slogan of 'Jayabhim' echoed in the character of Chandrabhage in Pandhari