सुरक्षारक्षकानं सांगितलं अन् आगीची घटना कळाली.. पंधरा तासानंतरही आग शमेना...आतून ओरडण्याचा आवाज आला अन्

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 18, 2025 18:06 IST2025-05-18T18:05:46+5:302025-05-18T18:06:10+5:30

Solapur Fire News: सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

The security guard told him and the fire incident was reported.. Even after fifteen hours, the fire was not extinguished... There was a scream from inside and | सुरक्षारक्षकानं सांगितलं अन् आगीची घटना कळाली.. पंधरा तासानंतरही आग शमेना...आतून ओरडण्याचा आवाज आला अन्

सुरक्षारक्षकानं सांगितलं अन् आगीची घटना कळाली.. पंधरा तासानंतरही आग शमेना...आतून ओरडण्याचा आवाज आला अन्

- आप्पासाहेब पाटील 
सोलापूर - सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षारक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले. तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळ आल्या. कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण ८  जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते. मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले. तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा ५ जणांचा शोध सुरूच होता. मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, त्यांचा नातू अनस ( २६ ) ,नात सून शिफा मन्सूरी  ( २४ )  तसेच नातवाचा मुलगा युसूफ (१) व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा ५ जणांचे मृतदेह मिळाले.सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

दरम्यान, मागील पंधरा तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक गाड्यातील पाण्याचा मारा करण्यात आला तरीही आग आटोक्यात अद्याप पर्यंत आलेली नाही.

Web Title: The security guard told him and the fire incident was reported.. Even after fifteen hours, the fire was not extinguished... There was a scream from inside and

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.