सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा, नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

By संताजी शिंदे | Updated: October 5, 2023 12:20 IST2023-10-05T12:19:02+5:302023-10-05T12:20:06+5:30

प्रकाश महानवर यांनी मुंबई मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

The new Vice-Chancellor of Solapur University was felicitated by the new Guardian Minister | सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा, नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा, नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

संताजी शिंदे-सोलापूर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा.डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांचा नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केला.

सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी प्रा.डॉ.प्रकाश अण्णा महानवर यांची राज्यपाल रमैश बैस यांनी नियुक्ती केली. नियुक्ती झाल्यानंतर प्रा.डॉ. प्रकाश महानवर यांनी मुंबई मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ.महानवर यांना शाल, पुष्पगुच्छ व 'मोदी ग्लोबल ऑर्डर' हे पुस्तक भेट देवून सत्कार केला. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांची सोलापूरचे नवीन पालकमंत्री नियुक्ती झाली आहे. दोघेही सोलापूरला येण्या आधी मुंबईतच नव्या पालकमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूचा सत्कार केला.

 

Web Title: The new Vice-Chancellor of Solapur University was felicitated by the new Guardian Minister