पोलिसांना गुंगारा देणारा मोस्ट वॉन्टेड 'छन्या' जेरबंद

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 4, 2024 20:25 IST2024-03-04T20:22:23+5:302024-03-04T20:25:12+5:30

छन्या भीमशा भोसले याला कामती पोलिसांनी जेरबंद केले आहे.

The most wanted Chhanya is arrested by police | पोलिसांना गुंगारा देणारा मोस्ट वॉन्टेड 'छन्या' जेरबंद

पोलिसांना गुंगारा देणारा मोस्ट वॉन्टेड 'छन्या' जेरबंद

सोलापूर: जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चोरी, खून, दरोडा अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत छन्या भीमशा भोसले याला कामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. मागील काही वर्षांपासून गुन्हे करून तो पोलिसांना गुंगारा देत होता. कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. 


 पोलिस सूत्राकडील माहितीनुसार कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलिसांचे पथक त्याच्या शोधात होते. छन्या जामगाव (ता.मोहोळ) येथे आल्याचे समजताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उदार, हवालदार सर्जेराव बोबडे, सचिन जाधवर, हरीश थोरात, राहुल दोरकर, अनुप दळवी, निशिकांत येळे हे तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दांड पट्टा, सुरा ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: The most wanted Chhanya is arrested by police