नवऱ्याने भांडणात बायकोचे जोरात कान ओढले; कानच फाटून बाजूला झाले, सोलापूरमधील घटना
By रूपेश हेळवे | Updated: April 7, 2023 12:15 IST2023-04-07T12:15:29+5:302023-04-07T12:15:38+5:30
बुधवारी सायंकाळी घरामध्ये दोघा नवरा बायकोचे घरगुती वादात भांडण झाले.

नवऱ्याने भांडणात बायकोचे जोरात कान ओढले; कानच फाटून बाजूला झाले, सोलापूरमधील घटना
सोलापूर : कौटुंबिक कारणातून झालेल्या भांडणात नवऱ्याने रागाच्या भरात बायकोचे कानच फाटून बाजूला झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील उटगी गावात घडली. विजयलक्ष्मी जमादार (वय २९, रा. उटगी ) असे त्या जखमी पत्नीचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी घरामध्ये दोघा नवरा बायकोचे घरगुती वादात भांडण झाले. त्यावेळी रागात नवऱ्याने पत्नीचे कान धरून जोरात ओढल्याने कानच फाटून बाजूला झाले. यामुळे जखमी झाल्याने विजयालक्ष्मी यांना उपचाराकरिता अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यात नेऊन पुढील उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, या घटनेचा तपास सोलापूर तालुका पोलिस चौकीचे लिंगय्या स्वामी हे करत आहेत.