महापालिका नाेकर भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेणार

By राकेश कदम | Updated: January 10, 2024 19:40 IST2024-01-10T19:40:01+5:302024-01-10T19:40:08+5:30

नियाेजन सुरू : सहायक आयुक्तांची माहिती

The exam will be held in the month of February for municipal servant recruitment | महापालिका नाेकर भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेणार

महापालिका नाेकर भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेणार

राकेश कदम

साेलापूर : महापालिकेच्या ३०२ पदांच्या भरतीसाठी २३ हजार ४३० अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज वरिष्ठ श्रेणी लिपीक या पदासाठी आहेत. सर्वच पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात १२ ते १५ फेब्रुवारी यादरम्यान परीक्षा घेण्याचे नियाेजन सुरू असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त शशिकांत भाेसले यांनी बुधवारी दिली.

महापालिकेने १० नाेव्हेंबर राेजी भरती प्रक्रिया सुरू केली हाेती. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर राेजीची अखेरची मुदत दिली हाेती. उमेदवारांनी अर्ज भरण्यास चांगला प्रतिसाद दिला. ३०२ पदांसाठी २३ हजार ४३० अर्ज आले आहेत. लिपीक पदासाठी ८ हजार अर्ज आले आहेत. विविध खात्यातील ७० अभियंता पदासाठी ६ हजार अर्ज आले आहेत.

या अर्जांची छाननी सुरू आहे. भरती प्रक्रिया टीसीएस या कंपनीमार्फत ऑनलाइन सुरू आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नुकतीच चर्चा झाली आहे. उमेदवारांना परीक्षेसाठी सेंटर निवडण्याची मुभा हाेती. या सेंटरवर परीक्षा घेण्याचे नियाेजन आहे. लवकरच तारीख जाहीर करू, असे भाेसले यांनी सांगितले.

 

Web Title: The exam will be held in the month of February for municipal servant recruitment