वीट फेकून मारल्याने चालकाचे डोके फुटले; एनटीपीसीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसची काच फोडली
By Appasaheb.patil | Updated: November 8, 2022 17:55 IST2022-11-08T17:54:47+5:302022-11-08T17:55:27+5:30
रस्त्यावर लावलेली मोटारसायकल बसचालकाने काढण्यास सांगितले, त्यानंतर सतीश गायकवाड याने माझी मोटारसायकल बाजूला घेत नाही असे म्हणत शिवीगाळ करून वीटेने चालकाला जखमी केले.

वीट फेकून मारल्याने चालकाचे डोके फुटले; एनटीपीसीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसची काच फोडली
सोलापूर - रस्त्यावर लावलेली दुचाकी काढण्याच्या वादातून एकाने वीट फेकून मारत बसचालकाचे डोके फोडले. एवढेच नव्हे तर एनटीपीसी प्रकल्पातील कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्याची घटना ६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली. मात्र ७ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा याबाबतचा वळसंग पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन दिगंबर सुरवसे (३२, रा. जेऊर, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सतीष गायकवाड (रा. होटगी, ता. द. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एनटीपीसी प्रकल्प, फताटेवाडी ते सोलापूर जाणार्या रोउवर होटगी, शिंगडगाव चौकात चालक अर्जुन सुरवसे हे बस क्रमांक एमएच १३ डीक्यू १७१८ मधून एनटीपीसीमधील कर्मचारी घेऊन जात होते. रस्त्यावर लावलेली मोटारसायकल बसचालकाने काढण्यास सांगितले, त्यानंतर सतीश गायकवाड याने माझी मोटारसायकल बाजूला घेत नाही असे म्हणत शिवीगाळ करून वीटेने चालकाला जखमी केले. त्यानंतर बसच्या काचा फोडल्या. या घटनेत बसचे ८० हजाराचे नुकसान झाले आहे.