जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ४ डिसेंबरला होईल प्रसिद्ध
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 21, 2023 17:43 IST2023-11-21T17:43:31+5:302023-11-21T17:43:44+5:30
प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी गुगलच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम केले आहेत.

जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ४ डिसेंबरला होईल प्रसिद्ध
सोलापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२४ पूर्वी जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम प्रस्तावित असून सध्या या गावात प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. ४ डिसेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर, ग्रामस्थांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी गुगलच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम केले आहेत. १६ ऑक्टोबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे प्रभाग पाडून सीमा निश्चित केल्या आहेत. सीमा निश्चित केलेल्या प्रभागांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर करण्यात आला. सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला असून आयोगाच्या सूचनेनुसार त्यात दुरुस्ती होतील.
या ग्रामपंचायतींची मुदत संपणार
बार्शी : सुर्डी, लाडोळे, रूई, ताडसोंदणे, दहिटणे.
दक्षिण सोलापूर : कुडल, आलेगाव.
अक्कलकोट : सातनदुधनी, संगोगी ब., समर्थनगर, कलप्पावाडी, गांधीनगर साेळसे लमाण तांडा.
माढा : वेणेगाव, उजनी टे.
करमाळा : वरकुटे, भाळवणी, लव्हे.
पंढरपूर : बिटरगाव, जळोली, जाधववाडी, पांढरेवाडी, गाडी, लोणारवाडी.
मोहोळ : कोन्हेरी, लमाणतांडा, वड्डेगाव, गोटेवाडी.
सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी, गळवेवाडी, सोनंद.
मंगळवेढा : कागष्ट, माळेवाडी, खवे, जित्ती, शिवणगी, येळगी, हुन्नर, खुडूस, हनुमानवाडी, जाधववाडी, झंजेवाडी, सुळेवाडी, डोंबाळवाडी, पिलीव, भांबुर्डी, डोंबाळवाडी कु., झिंजेवस्ती.