विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 1, 2023 12:37 IST2023-12-01T12:37:00+5:302023-12-01T12:37:19+5:30

विभागीय आयुक्त सौरभ राव हे रविवार, ३ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

The Divisional Commissioner will review the election work on his visit to Solapur tomorrow | विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा

विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : जिल्ह्यात सध्या छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुननिरिक्षण कार्यक्रम सुरू असून सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती झाली आहे. सोलापुरातील निवडणूक कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव हे रविवार, ३ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

येथील लोकप्रतिनीधी, राजकीय पक्षांच्या जिल्हा अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची रविवारी दहा वाजता नवीन महसूल भवन मध्ये बैठक नियोजित असून या बैठकीत सौरभ राव मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीनंतर राव हे काही मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. त्यानंतर, मतदारांशी संवाद साधून त्यांच्या सूचना देखील ऐकणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Web Title: The Divisional Commissioner will review the election work on his visit to Solapur tomorrow