अमित शहांविरोधात ठाकरे गट आक्रमक, MIDC पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:29 IST2023-02-22T15:21:09+5:302023-02-22T15:29:09+5:30
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अमित शहा यांनी अपशब्द व अपमानित भाषा वापरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

अमित शहांविरोधात ठाकरे गट आक्रमक, MIDC पोलिसात तक्रार
रविंद्र देशमुख/सोलापूर
सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे करण्यात आली. पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शरणबसप्पा केंगनाळकर यांनी ही तक्रार दिली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अमित शहा यांनी अपशब्द व अपमानित भाषा वापरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वक्तव्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेतील कलम १५३ अ ४९९ ,५००, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख शरणबसप्पा केंगनाळकर, योगिराज पाटील, युवा सेनेचे आकाश गंगदे,आनंद बुक्कानुवरे, राहुल गंधुरे, सचिन गंधुरे, जयराम सुंचू, राजू गुणापुरे, विश्वनाथ कोगनुरे, बसू पूजारी, सचिन चौगुले आदी शिवसैनिक उपस्थित होते.