Textile workers perfectly fit; After getting rid of corona, now he is engaged in exercise ...! | चांगली बातमी; कोरोनामुक्त झाल्यानंतर आता ते व्यायामात मग्न...! 

चांगली बातमी; कोरोनामुक्त झाल्यानंतर आता ते व्यायामात मग्न...! 

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : छातीत दुखत असल्याने गवळी वस्ती येथील एक नागरिक शासकीय रुग्णालयात ॲडमिट झाले. त्यांची 'कोरोना' टेस्ट करण्यात आली. ते पॉझिटिव्ह निघाले. पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आल्यानंतर सुरवातीला भीती वाटली पण नंतर भीती निघून गेली. रुग्णालयात उपचारानंतर आता ते पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. ते पुन्हा तंदुरूस्त बनले असून रोज पहाटे लवकर उठून जोर-बैठका, सूर्यनमस्कार तसेच शारीरिक कसरतीत रमले आहेत. ते गवळी वस्ती येथील रहिवासी असून ते या ४५ वर्षांचे आहेत. रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम खूप गरजेचे आहे. नियमित चांगले व्यायाम करा आणि पोस्टीक जेवण घ्या असा सल्लाही ते आवर्जून देतात. 

'कोरोना'वर मात केल्यानंतर लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात सुरुवातीला त्रास झाला. पण हिंमतीने उपचाराला प्रतिसाद देत राहिलो. डॉक्टरांशी संवाद करत राहिलो. डॉक्टर काय सूचना देखील त्याचे पालन करत राहिलो. त्यामुळे मी लवकर कोरोना मुक्त झालो. टेक्स्टाईल कर्मचारी असून सध्या होम कोरंटाईन मध्ये आहेत. रोज पहाटे लवकर उठून घरासमोरील मोकळ्या जागेत ते नियमितपणे व्यायाम करतायेत. त्यांच्या या धाडसाचे तसेच समंजसपणाचे गवळी वस्ती परिसरात कौतुक होत आहे. त्यांच्या या धाडसातून प्रेरणा घेत बरे झालेले रुग्णही व्यायाम करत आहेत. नागनाथ सांगतात, कोरोना हा खूप सिम्पल आजार आहे. कोरोना आजाराला घाबरायचे काहीच आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध-पाणी घेत जा. चिंतामुक्त रहा. काही दिवसातच तुम्ही कोरोना मुक्त व्हाल.

कोरोना बाधित रुग्ण औषध टाकून द्यायचे...

ते सांगतात, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सर्वप्रथम शासकीय रुग्णालयात दाखल केले. दहा दिवस शासकीय रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये सहा दिवस उपचार झाले. उपचारादरम्यान डॉक्टर औषध (गोळ्या) द्यायचे, ते मी नियमितपणे घेत होतो. इतर पीडित रुग्ण औषध पूर्णपणे न घेता टाकून द्यायचे. मी त्यांना सांगत होतो की कोरोना मुक्त होण्यासाठी औषध पूर्णपणे घ्या. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या टाकून देऊ नका. पण लोक विचित्र वागत होते. त्यांनी कोरोनाची धास्ती घेतली होती. त्यामुळे ते औषध टाकून द्यायचे. ते चुकीचे आहे. लोकांनी तसे करू नये, असा मौलिक सल्लाही ते देतात.

Web Title: Textile workers perfectly fit; After getting rid of corona, now he is engaged in exercise ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.