टेरी टॉवेल प्रदर्शन; भारतासह विदेशातील खरेदीदार, कंपन्यांचे प्रतिनिधी उद्या सोलापुरात

By Appasaheb.patil | Published: September 24, 2019 07:00 PM2019-09-24T19:00:18+5:302019-09-24T19:02:21+5:30

पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल प्रदर्शनासस होणार प्रारंभ; चर्चासत्राचेही केले आयोजन

Terry Towel performance; Representatives from overseas buyers, companies including India to Solapur tomorrow | टेरी टॉवेल प्रदर्शन; भारतासह विदेशातील खरेदीदार, कंपन्यांचे प्रतिनिधी उद्या सोलापुरात

टेरी टॉवेल प्रदर्शन; भारतासह विदेशातील खरेदीदार, कंपन्यांचे प्रतिनिधी उद्या सोलापुरात

googlenewsNext
ठळक मुद्देफक्त सोलापुरातीलच टेरी टॉवेल उत्पादकांना या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या उत्पादनाची माहिती देता येणारजगात लागणाºया कोणत्याही प्रकारचे, दर्जाचे टॉवेल आता सोलापुरात तयार होऊ शकतेविव्हिंगच्या अनुषंगाने असो वा प्रोसेसिंग याची माहिती देणे, हा सुध्दा प्रदर्शन भरविण्यामागचा एक मुख्य हेतू

सोलापूर : ‘टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फौंडेशन’च्यावतीने ग्लोबल नेटवर्कच्या सहयोगाने सोलापुरात दि. २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान ‘व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्स्पो व समिट २०१९’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उद्या, बुधवार २५ सप्टेंबर २०१९ रोजी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या प्रांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. 

  राज्याचे वस्त्रोद्योग सचिव डॉ. के. एच. गोविंदराज प्रदर्शनाचे उदघाटन करतील. भारत सरकारचे वस्त्रोद्योग संचालक  सुशील गायकवाड,  राज्याच्या वस्त्रोद्योग आयोगाचे डॉ. माधवी खोडे-चवरे, 'एनएसआयसी'चे विभागीय सरव्यवस्थापक  संजय बोंडेकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत. 

    या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात  दरम्यान दुबईच्या कॉटनोपॉलिसचे प्रमुख श्री. बिपीन, मुंबईच्या सुविन अ‍ॅडव्हायझर्सचे कार्यकारी अधिकारी अविनाश मयेकर, मुंबईच्या गॉटस् सर्टिफिकेशनचे सुमित गुप्ता, दिल्लीच्या बाईग एजंटस असोसिएशनचे अपुर्वा अगरवाल, रोहिणी सुरी, अहमदाबादचे टेक्स्टाईल तज्ञ अशोक भगत, अ‍ॅमेझॉन ग्लोबल सेलिंगचे बर्जिंदर सिंग यांसारख्या आंतरराष्ट्रीय किर्तींच्या विविध मान्यवरांचे विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. 

सोलापुरात होटगी रोडवरील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या प्रांगणात भरत असलेल्या या प्रदर्शनास देश-विदेशातील असंख्य ग्राहक, खरेदीदार, पर्यटक, आयातदार-निर्यातदार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी व कापोर्रेट कंपन्या भेटी देणार आहेत. या प्रदर्शनाचा फोकस केवळ टेरी टॉवेलवर असून, फक्त सोलापुरातीलच टेरी टॉवेल उत्पादकांना या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या उत्पादनाची माहिती देता येणार आहे व थेट विक्रीही करता येणार आहे. सोलापुरात वेगाने आधुनिकीकरण होत आहे. जगात लागणाºया कोणत्याही प्रकारचे, दर्जाचे टॉवेल आता सोलापुरात तयार होऊ शकते, मग ते विव्हिंगच्या अनुषंगाने असो वा प्रोसेसिंग याची माहिती देणे, हा सुध्दा प्रदर्शन भरविण्यामागचा एक मुख्य हेतू आहे.  

अनेक वर्षापासून विविध संकंटांचा सामना करीत कसेबसे तग धरून असलेल्या येथील यंत्रमाग उद्योगाला सध्याच्या मंदीच्या काळात या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने नवा आशेचा किरण दिसत आहे. 
----------
तीन हजार टॉवेल्सह मानवी साखळी करणार
या प्रदर्शनाच्या समारोपाच्या निमित्ताने शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहराच्या पूर्व भागात टॉवेलसह ३ हजार लोकांची मानवी साखळी करुन विश्वविक्रम (गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड) करण्याचा मानस आहे. जास्तीत जास्त सोलापूरकरांनी उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फौंडेशनने केले आहे.

Web Title: Terry Towel performance; Representatives from overseas buyers, companies including India to Solapur tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.