शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

coronavirus; क्वारंटाईनचा रुग्ण शोधणाºया पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:59 AM

सोलापूर ग्रामीण पोलिसांची योजना; प्रत्येक गावावर आता पोलीसांची करडी नजर

ठळक मुद्देलोकांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी संचारबंदीत सोय करण्यात येत आहेभाजीपाला, दूध व किराणा माल आणण्यास जाणाºयांना काही प्रमाणात सवलत ग्रामपंचायतीमार्फत दुकानासमोर व भाजीमंडईत लोकांना विशिष्ट अंतर ठेवून उभारण्यासाठी खुणा

सोलापूर : क्वारंटाईनचा रुग्ण शोधणाºया पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. 

कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी व संचारबंदीचा अंमल जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात मुंबई, पुणे व इतर राज्यातून लोक येत आहेत अशा तक्रारी वाढल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकेबंदीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत किंवा गस्ती दरम्यान क्वारंटाईन (घरात निगराणीखाली) केलेला संशयित रुग्ण फिरताना पकडणाºया पोलिसाला दहा हजार बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्रभावीपणे गस्त व नाकाबंदीचे काम व्हावे या उद्देशाने हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

शहर व जिल्ह्यात जमावबंदी व कोरोना साथीच्या प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी लागू केलेले बंदी आदेश मोडल्याप्रकरणी आत्तापर्यंत ४४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचा अंमल प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गुढीपाडव्याचा सण असल्याने त्यानिमित्त खरेदीसाठी येणाºया लोकांना काही काळ सवलत देण्यात आली. पण तरीही किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी गर्दी  वाढू लागल्याने पोलिसांनी अंमलबजावणी कडक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यामुळे साथीचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे व घरात बसण्याबाबत आवाहन करूनसुद्धा लोक मोठ्या संख्येने बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. 

सुविधांना अडचण नाही- लोकांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी संचारबंदीत सोय करण्यात येत आहे. भाजीपाला, दूध व किराणा माल आणण्यास जाणाºयांना काही प्रमाणात सवलत दिली जात आहे. पण दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायतीमार्फत दुकानासमोर व भाजीमंडईत लोकांना विशिष्ट अंतर ठेवून उभारण्यासाठी खुणा करण्याबाबत सुचित केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस