coronavirus; क्वारंटाईनचा रुग्ण शोधणाºया पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:59 AM2020-03-26T11:59:11+5:302020-03-26T12:01:16+5:30

सोलापूर ग्रामीण पोलिसांची योजना; प्रत्येक गावावर आता पोलीसांची करडी नजर

Ten thousand bounty to police seeking quarantine patient | coronavirus; क्वारंटाईनचा रुग्ण शोधणाºया पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस

coronavirus; क्वारंटाईनचा रुग्ण शोधणाºया पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस

Next
ठळक मुद्देलोकांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी संचारबंदीत सोय करण्यात येत आहेभाजीपाला, दूध व किराणा माल आणण्यास जाणाºयांना काही प्रमाणात सवलत ग्रामपंचायतीमार्फत दुकानासमोर व भाजीमंडईत लोकांना विशिष्ट अंतर ठेवून उभारण्यासाठी खुणा

सोलापूर : क्वारंटाईनचा रुग्ण शोधणाºया पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. 

कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी व संचारबंदीचा अंमल जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात मुंबई, पुणे व इतर राज्यातून लोक येत आहेत अशा तक्रारी वाढल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकेबंदीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत किंवा गस्ती दरम्यान क्वारंटाईन (घरात निगराणीखाली) केलेला संशयित रुग्ण फिरताना पकडणाºया पोलिसाला दहा हजार बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्रभावीपणे गस्त व नाकाबंदीचे काम व्हावे या उद्देशाने हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

शहर व जिल्ह्यात जमावबंदी व कोरोना साथीच्या प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी लागू केलेले बंदी आदेश मोडल्याप्रकरणी आत्तापर्यंत ४४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचा अंमल प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गुढीपाडव्याचा सण असल्याने त्यानिमित्त खरेदीसाठी येणाºया लोकांना काही काळ सवलत देण्यात आली. पण तरीही किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी गर्दी  वाढू लागल्याने पोलिसांनी अंमलबजावणी कडक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यामुळे साथीचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे व घरात बसण्याबाबत आवाहन करूनसुद्धा लोक मोठ्या संख्येने बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. 

सुविधांना अडचण नाही
- लोकांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी संचारबंदीत सोय करण्यात येत आहे. भाजीपाला, दूध व किराणा माल आणण्यास जाणाºयांना काही प्रमाणात सवलत दिली जात आहे. पण दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायतीमार्फत दुकानासमोर व भाजीमंडईत लोकांना विशिष्ट अंतर ठेवून उभारण्यासाठी खुणा करण्याबाबत सुचित केले आहे. 

Web Title: Ten thousand bounty to police seeking quarantine patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.