विदेशी मद्याच्या बाटल्यासह टेम्पो राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 20:56 IST2021-10-03T20:56:37+5:302021-10-03T20:56:57+5:30
सोलापूर लोकमत न्युज

विदेशी मद्याच्या बाटल्यासह टेम्पो राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पकडला
सांगोला : राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे यांच्या पथकाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस व पंढरपूर यांनी संयुक्तपणे भरधाव निघालेला टेम्पो थांबून केलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित विक्रीस परवानगी असलेल्या सुमारे २५ हजार ३४४ विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह टाटा कंपनीचा टेम्पो असा एकुण सुमारे ५६ लाख २९ हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई शनिवारी आटपाडी - पंढरपूर रोड वरील कटफळ ता.सांगोला गावाच्या हद्दीतील हॉटेल किनारा समोर केली. या गुन्ह्यात ज्ञानेश्वर अशोक भोसले (रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) यास अटक केली आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क पथकाने या वर्षात बहुदा पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.