चालू टेम्पो चालकाविनाच पुढे गेला, रस्त्यावरील दुचाकीला फरपटत नेले

By विठ्ठल खेळगी | Published: March 22, 2023 12:13 PM2023-03-22T12:13:11+5:302023-03-22T12:13:50+5:30

या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले आहे.

tempo moved forward without a rider taking the bike on the road accident solapur | चालू टेम्पो चालकाविनाच पुढे गेला, रस्त्यावरील दुचाकीला फरपटत नेले

चालू टेम्पो चालकाविनाच पुढे गेला, रस्त्यावरील दुचाकीला फरपटत नेले

googlenewsNext

सोलापूर : रस्त्याच्या कडेला चालकाविना थांबविलेला चालू टेम्पो अचानक पुढे जाऊन उभ्या स्कुटीला फरपटत नेले. टेम्पोखाली स्कुटी अडकल्याने भिंतीजवळ जाऊन टेम्पो थांबला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवार, दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास सांगोला तलाठी कार्यालयासमोर घडली. या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी ७:३०च्या सुमारास एमएच ४५ टी ३८७१ क्रमांकाचा आयशर टेम्पो चालू स्थितीत सांगोला येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात रस्त्याच्या कडेला उभा करून चालक पानपट्टीकडे गेला होता. यानंतर अचानक टेम्पो चालू होऊन सांगोला तलाठी कार्यालयासमोर उभी असलेली दुचाकी क्रमांक एमएच ४५ एएस १५६१ ही टेम्पोखाली आल्यामुळे फरपटत घेऊन गेला. हा प्रकार अचानक घडल्याने तहसील कार्यालयासमोर काही वेळ गोंधळ उडाला होता.

 

Web Title: tempo moved forward without a rider taking the bike on the road accident solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.