शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत आसवं, मनात आठवणी, नियतीने मांडली 'दुःखाची' प्रश्नपत्रिका; वडिलांचा मृतदेह घरात असतानाही धनश्रीने दिली बोर्डाची परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:49 IST

परीक्षेनंतर घरी पोहोचल्यानंतर तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याची हृदयस्पर्शी घटना सोलापुरात घडली.

आप्पासाहेब पाटील -

सोलापूर : आजकाल धकाधकीच्या जीवनात केव्हा काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. घरात वडिलांचे निधन झाले असतानाही त्या परिस्थितीचे दु:ख बाजूला ठेवून दहावीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी परीक्षा केंद्रात पोहोचली अन् परीक्षा दिली. परीक्षे देऊन घरी पोहोचल्यानंतर तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेतले आणि अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याची हृदयस्पर्शी घटना सोलापुरात घडली.

दरम्यान, धनश्री भिकाजी पवार ही शरदचंद्र पवार प्रशालेत दहावी इयत्तेत शिकत होती. तिचा आज शुक्रवारी पुणे बोर्डाचा मराठीचा पहिला पेपर सकाळी दहा वाजता सोलापुरातील भू. म. पुल्ली कन्या प्रशाला केंद्रावर होता. ती परीक्षेला निघण्याच्या तयारीत असताना रुग्णालयात डायलिसेसचे उपचार घेत असलेले तिचे वडील भिकाजी पवार यांचे निधन झाले. अशा दु:खद परिस्थितीत ती परीक्षा देणार नव्हती. मात्र प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिचे सांत्वन करीत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून परीक्षा देण्यास प्रवृत्त केले. तिला घरातून परीक्षा केंद्रावर पोहोचविले अन् तिने दु:ख बाजूला ठेवत पहिला मराठीचा पेपर दिला. त्यानंतर तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 केद्रप्रमुख अन् मुख्याध्यापकांची धडपड... -दहावी बोर्ड परीक्षा आयुष्याची दिशा ठरविणारी असते. त्यासाठी धनश्री सज्ज होत होती. भू. म. पुल्ली कन्या प्रशाला केंद्रावर तिच्या स्वप्नांची पहिली पायरी उभी होती. पण नियतीने वेगळीच प्रश्नपत्रिका तिच्यासमोर ठेवली. तिच्या वडिलांचे निधन झाले हे कळताच शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक व राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने तिच्या घरात पोहोचले. घरातून तिला गाडीवर बसवून परीक्षा केंद्रात आणले. तिला पेपर सोडविण्यासाठी केंद्रप्रमुख गीता सादूल यांनी धीर दिला.

शिक्षणधिकारी सचिन जगताप यांची सतर्कता... -धनश्रीच्या घटनेबाबत माध्यामिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कळताच ते भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर तात्काळ हजर झाले. त्यांनी मुलींची विचारपूस करीत तिला परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. संबंधितांना त्या मुलीला परीक्षा देताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सुचना केल्या. त्या मुलीचे शिक्षणाधिकारी यांनी सांत्वन करीत आम्ही तुझ्यासोबत आहोत असं बोलून धीर दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amidst grief, daughter writes board exam after father's death.

Web Summary : In Solapur, a grieving daughter, Dhanashree, wrote her crucial board exam despite her father's sudden demise. Encouraged by her principal, she balanced grief and academic commitment, attending the funeral post-exam. Education officials supported her during this difficult time.
टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीStudentविद्यार्थीexamपरीक्षा