शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा

By appasaheb.patil | Updated: January 23, 2020 09:38 IST

टॅक्सची मर्यादा वाढविण्याची मागणी : जीएसटीचे स्लॅब कमी करून मेडिकल, मेडिसीनमधील टॅक्स कमी करावा

ठळक मुद्देभारतात सुरू करण्यात आलेली जीएसटी ही करप्रणाली पूर्णपणे चुकीची प्रत्येक वस्तूंवर ठरविण्यात आलेले स्लॅब ही पध्दत चुकीची सरकारने जीएसटी करप्रणाली सुधारणा करणे आवश्यक

सोलापूर : भारतीय अर्थव्यवस्थेत करदात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे़ करदाता हाच देशाचा मुख्य भांडवलदार आहे़ करदाता हा देशाचा मुख्य कणा आहे़ आपण जास्त दिवस आयुष्य जगावे यासाठी शरीराची काळजी घेतो त्याचप्रमाणे सरकारने देशातील सर्वच करदात्यांची काळजी घ्यायला हवी़ जीएसटीच्या कमी-जास्त स्लॅबमुळे वैतागलेल्या व्यापाºयांना दिलासा देणारा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात व्हायला हवा़ जीएसटी स्लॅब कमी करावा, टॅक्सची मर्यादा वाढवावी, मेडिकल, मेडिसीनमधील सर्व सेवासुविधा, औषधोपचारांवरील टॅक्स कमी करून सर्वसामान्यांसह देशातील प्रत्येक नागरिकास दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया शहरातील व्यापाºयांनी व्यक्त केली.

सध्या भारत प्रगतिपथावर आहे़ सर्वच क्षेत्रांत टॅक्स लागू केल्याने भारताच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे़ मात्र सर्वसामान्यांवर लादलेले टॅक्सेस कमी करावेत़ इन्कम टॅक्सची मर्यादा २ लाखांवरून अडीच लाख करण्यात आली, ती आणखीन कमी करून पाच लाखांची मर्यादा करावी़ सर्वसामान्य व्यक्ती पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा टॅक्स भरण्याकडे जास्तीचा कल देत आहे़ त्यामुळे सरकारने सर्वसामान्य लोकांचा विचार करून इन्कम टॅक्सचे स्लॅब कमी करावेत़ शिवाय जीएसटीचाही स्लॅब कमी करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत़ - मिलिंद वेणेगुरकर,सराफ व्यावसायिक, सोलापूर

कोणत्या गोष्टी स्वस्त व कोणत्या गोष्टी महाग व्हायला हव्यात हे सर्वकाही जीएसटीवर अवलंबून आहे़ त्यामुळे सरकारने जीएसटीचे स्लॅब कमी करावेत, जीएसटीची वेबसाईट हॅक होते त्यात सुधारणा कराव्यात, कापड, सोन्यावरील जीएसटी वाढवू नये, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, टॅक्स भरणाºया सर्वांची सरकारनं काळजी घ्यायला हवी़ देशातील महागाई दूर होण्यासाठीचे धोरण आखायला हवे़ कापड उद्योगाला चालना देणारा अर्थसंकल्प असावा़- राजेश पवार,व्ही़ आऱ पवार सारीज, सोलापूर

भारतातील अर्थव्यवस्था एक आदर्श अर्थव्यवस्था म्हणून समजली जाते़ मात्र जीएसटी करप्रणाली राबविल्यापासून देशातील कर भरणाºयांची अडचण झाली आह़े़ केंद्राने आगामी अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील २८ टक्के असलेला स्लॅब १८ टक्के करावा़ शिवाय जीएसटी करप्रणालीत असलेले स्लॅब कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यायला हवा़ कराची मर्यादा अडीच लाखांवरून पाच लाख व्हायला हवी़ दरम्यान, महागाई कमी करणारा, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असायला हवा़- ईश्वर मालू,इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स, सोलापूऱ

भारतात सुरू करण्यात आलेली जीएसटी ही करप्रणाली पूर्णपणे चुकीची आहे़ त्यात प्रत्येक वस्तूंवर ठरविण्यात आलेले स्लॅब ही पध्दत चुकीची आहे़ सरकारने जीएसटी करप्रणाली सुधारणा करणे आवश्यक आहे़ शिवाय कर मर्यादाही वाढविली पाहिजे़ दरम्यान, अडीच लाखांहून पाच लाखांपर्यंतची मर्यादा वाढविणे आवश्यक आहे़ सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असायला हवा़ महागाई, इंधन, गॅसच्या किमती कमी व्हायला हव्यात, ग्रामीण भागाचा विकास करणारा अर्थसंकल्प हवा़- चंदरलाल आहुजा,चांदनी सारीज, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरbudget 2020बजेट २०१९businessव्यवसायGSTजीएसटी