शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीची चवच 'लय भारी', दुबईकरांना आवडतेय सोलापूरची 'ज्वारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 10:01 IST

बार्शीची मालदांडी व ज्यूट ज्वारीही राज्यासह परराज्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत ज्वारीचे उत्पादन घेतले जात असले तरी ग्राहक खास बार्शीच्या ज्वारीची मागणी करतात.

ठळक मुद्देराज्यातील मुंबई, पुणे, नांदेड, सांगली, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, यासह हुबळी, धारवाड, गदग, बेंगलोर, दावणगिरी, हैदराबाद आदी विविध शहरांतील बाजारपेठेत पाठविला जातो.

शहाजी फुरडे-पाटील

सोलापूर - जिल्ह्यातील शाळू ज्वारीची चर्चा दुबईत होत असून बार्शीतील या ज्वारीच्या भाकरी थेट दुबईतही चवीन चाखल्या जात आहेत. मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या बार्शीची अनेक क्षेत्रात सरशी पाहायला मिळते. सिताफळ उत्पादनातून कृषी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या बार्शीची ज्वारी आता दुबईत आवडीने खाल्ली जात आहेत. बार्शीच्या बाजारपेठेतून दररोज जवळपास 30 ते 40 ट्रक ज्वारी परराज्यात विक्रीसाठी पाठवली जाते. बार्शीची ही ज्वारी दुबईच्या मॉलमध्येही विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.   बार्शीची मालदांडी व ज्यूट ज्वारीही राज्यासह परराज्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत ज्वारीचे उत्पादन घेतले जात असले तरी ग्राहक खास बार्शीच्या ज्वारीची मागणी करतात. येथील मालदांडी ज्वारी शाळू या नावाने तर ज्यूट ज्वारी दूधमोगरा या नावाने बाहेरील बाजारपेठेत प्रचलित आहे. बार्शीतील या ज्वारीच्या ब्रॅण्डला कधी मागणी नाही असेही झाले नाही अन् कधी मालाचा तुटवडाही जाणवला नाही.

बार्शी तालुक्यात उत्पादित झालेली सर्व ज्वारी येथील बाजारपेठेतच विक्रीसाठी येते. येथील व्यापारी बांधवांकडून या मालाचे मशीन क्लिनिंग व प्रतवारी करून तो राज्यातील मुंबई, पुणे, नांदेड, सांगली, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, यासह हुबळी, धारवाड, गदग, बेंगलोर, दावणगिरी, हैदराबाद आदी विविध शहरांतील बाजारपेठेत पाठविला जातो. बार्शीची ज्वारी उच्च प्रतीची असल्याने बाजारपेठेत खास बार्शीच्या ज्वारीलाच मागणी असते. शिवाय व्यापारी बांधवांनीही ग्राहकांना ३० व ५० किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये बार्शीची शाळू, दूधमोगरा आदी नावाने आपापल्या ब्रॅण्डसह ती उपलब्ध करून दिली आहे.

दररोज एक कोटीच्या मालाची विक्री

सिझनमध्ये हाच आकडा साठ ते सत्तर ट्रक एवढा असतो. एका युनिटमध्ये तीस कामगार आहेत. म्हणजे या व्यवसायातून एक हजार कामगारांना बारा महिने रोजगार उपलब्ध झाला आहे. एका गाडीची किंमत ही तीन ते चार लाख होेते. म्हणजे या व्यवसायातून दररोज सुमारे एक कोटी रुपयांच्या मालाची विक्री होते.

ज्वारीची क्लिनिंग करून आपापल्या ब्रॅण्डच्या नावाने तीस किलो पॅकिंगमध्ये त्या ज्वारीची विक्री करतात. या ज्वारीला कोल्हापूर, कोकण, बंगळुरू, हैदराबाद, नांदेड, लातूर, हुबळी, धारवाड, गदग, सांगली, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, मुंंबई, दुबईसह देशातील विविध मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या ठिकाणी बार्शीची ज्वारी म्हणून या ज्वारीची विक्री होते.

- तुकाराम माने, माजी अध्यक्ष बार्शी मर्चंट असोसिशएन 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीDubaiदुबई