विदेशी दारु घेऊन निघालेली कार पकडली; ४२ हजारांची दारू जप्त 

By दिपक दुपारगुडे | Updated: April 23, 2023 18:44 IST2023-04-23T18:44:42+5:302023-04-23T18:44:55+5:30

बार्शी शहरातून विदेशी दारूचे बॉक्स निघालेली एक कार अडवून तालुका पोलिसांनी पकडली.

Taluka police intercepted a car carrying boxes of foreign liquor from Barshi city  | विदेशी दारु घेऊन निघालेली कार पकडली; ४२ हजारांची दारू जप्त 

विदेशी दारु घेऊन निघालेली कार पकडली; ४२ हजारांची दारू जप्त 

सोलापूर : बार्शी शहरातून विदेशी दारूचे बॉक्स निघालेली एक कार अडवून तालुका पोलिसांनी पकडली. या कारवाईत ४२ हजारांची दारु आणि कार जप्त केली. बार्शी-पानगाव रस्त्यावर सौंदरे गावाजवळ शनिवार, २२ एप्रिल राेजी रात्री ११ वाजेच्या पाेलिसांनी ही कारवाई केली. 

 याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण यांनी तालुका पोलीसात फिर्याद दिली असून कार  चालक बालाजी ज्ञानेश्वर बोधले (वय ३३, रा. चोराखळी, ता.कळंब, जि.धाराशिव) याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या कारवाईत ५४८ बाटल्या दारु आणि कार (एम. एच. २१/ व्ही. ८५१०) जप्त केली आहे.  

कारचालक कारमधून बार्शी येथून  विदेशी दारुचे बॉक्स घेऊन सोलापूरकडे निघाल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत नाईक अभय उंदरे, पोलीस काॅन्स्टेबल प्रल्हाद आकुलवार,  कॉन्स्टेबल गणेश भांगे,  गणेश चव्हाण यांचे पथक घटनास्थळ दाखल झाले.बार्शीहून निघालेली कार अडवली. कारची डिग्गी तपासली असता दारुचे बॉक्स आढळून आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करत आहेत .

 

Web Title: Taluka police intercepted a car carrying boxes of foreign liquor from Barshi city