सेल्फी घेत बप्पाला निरोप, गणपती घाटावर भाविकांची मोठी गर्दी

By रूपेश हेळवे | Updated: September 28, 2023 13:45 IST2023-09-28T13:38:23+5:302023-09-28T13:45:04+5:30

सोलापुरातील गणपती घाटात सकाळपासूनच गणपतीला विसर्जनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

Taking a selfie to say goodbye to Bappa, a large crowd of devotees at Ganapati Ghat | सेल्फी घेत बप्पाला निरोप, गणपती घाटावर भाविकांची मोठी गर्दी

सेल्फी घेत बप्पाला निरोप, गणपती घाटावर भाविकांची मोठी गर्दी

सोलापूर : गेल्या दहा दिवसापासून आपल्या सोबत असणाऱ्या बाप्पाला गुरुवारी निरोप देण्यात येत आहे. बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण बप्पा सोबत सेल्फी घेत असल्याचे चित्र गणपती घाटावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. 

सोलापुरातील गणपती घाटात सकाळपासूनच गणपतीला विसर्जनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. बाप्पाला निरोप देताना लहान मुले भाऊ होऊन रडतानाचे ही चित्र पाहायला मिळत आहे. बाप्पाला निरोप देताना लहान मंडळांकडून मोठ्या प्रमाणात पारंपारिक खेळ सादर करत सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत. 

दरम्यान, त्यासाठी महानगरपालिकेनेही चांगले नियोजन केलेले आहे. गर्दी होऊ नये यासाठी टप्प्या टप्प्यात वाहने थांबवण्यात येत आहेत. शिवाय निर्माल्य घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्यांचे ही व्यवस्था मनपाकडून करण्यात आली आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर लहान मुले ही विसर्जनासाठी कुंडाजवळ जाऊ नये यासाठी वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत.

Web Title: Taking a selfie to say goodbye to Bappa, a large crowd of devotees at Ganapati Ghat