गुड बोला. गोड बोला..; गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:11 IST2019-01-24T15:09:08+5:302019-01-24T15:11:04+5:30
शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून ...

गुड बोला. गोड बोला..; गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते - सुशीलकुमार शिंदे
शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे रोज अनेकजण येत असतात, त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात. त्यांना असं वाटतं की, माझं कुणीतरी ऐकून घेतलं पाहिजे.
आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो. तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो. सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो. रागीट माणसाला नेहमी ताणतणावाला सामोरे जावे लागते. मी स्वत: नेहमी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो.
हसत- हसत आपल्या घरी निघून जातो. गोड बोलण्याचे खूप फायदे असतात. त्यातून माणसे जोडता येतात. गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते. त्याच्याशी संवाद साधताना इतरांना आनंद मिळतो. याउलट रागावणाºया माणसांचं असतं. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो , आपण इतराशी गोड बोला.
आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो. तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो. सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो.
- सुशीलकुमार शिंदे
माजी केंद्रीय गृहमंत्री