शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

interview; ‘स्वाभिमानी’ ची काँग्रेससोबत चर्चा; सात लोकसभेच्या जागा लढविण्याचा झाला निर्णय ; रविकांत तुपकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:42 IST

सोलापूर : काँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत स्वाभिमानी संघटनेची एका बैठकीत चर्चा झाली आहे. आघाडीच्या माध्यमातून सात लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटना ...

ठळक मुद्देकाँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत स्वाभिमानी संघटनेची एका बैठकीत चर्चा - तुपकर आघाडीच्या माध्यमातून सात लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटना निवडणुकीत उमेदवार - तुपकर शेतकºयांना थकीत एफआरपीची रक्कम मिळवून देण्याचा विषय महत्त्वाचा - तुपकर

सोलापूर : काँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत स्वाभिमानी संघटनेची एका बैठकीत चर्चा झाली आहे. आघाडीच्या माध्यमातून सात लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटना निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहे; मात्र हा विषय आता संघटनेसाठी महत्त्वाचा नसून शेतकºयांना थकीत एफआरपीची रक्कम मिळवून देण्याचा विषय महत्त्वाचा आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठीच स्वाभिमानी संघटनेला प्रथम प्राधान्य असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

याचवेळी त्यांनी पुणे येथे साखर भवनावर एफआरपीसाठी काढण्यात येणाºया मोर्चाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेस समवेत याबाबत चर्चा झाल्याची कबुली दिली. 

हातकणगंले, माढा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार व धुळे या सात ठिकाणी काँग्रेसमवेत आघाडी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांकडून निवडणुका लढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेसकडूनच आघाडीसाठी खा. राजू शेट्टी यांना आमंत्रित करण्यात आल्याने त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समवेत चर्चा केली आहे. असे तुपकर यांनी सांगितले. 

७३ कारखान्यांकडे ५,३२० कोटी थकीत एफआरपी- रविकांत तुपकर यांनी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे काढण्यात येणाºया मोर्चाची माहिती दिली. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाची एकरकमी एफआरपी दिलेली नाही. राज्यातील ७३ साखर कारखान्यांनी शेतकºयांची ५ हजार ३२0 कोटींची एफआरपीची रक्कम थकविली आहे. साखर कारखानदारांकडून ४ हजार कोटींची रक्कम देण्याची तयारी आहे; मात्र राज्य शासन यासाठी एक हजार कोटींची मदत करण्यास तयार नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या साखर कारखान्याकडे ७७ कोटींची थकीत रक्कम आहे. त्यामुळे सहकारमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

साडेचार वर्षांत फक्त आॅनलाईन केंद्रावरच हेलपाटे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार खोटारडे व फसवे आहे. शेतकरी या सरकारला कंटाळला आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकºयांना मदत मिळत नाही. शेतकºयांच्या हमीभावासाठी कायदा केला असतानाही, त्या कायद्याची अंमलबजावणी सरकाकडून करण्यात येत नाही. मागील साडेचार वर्षांत शेतकरी व त्याच्या कुटुंबास केवळ आॅनलाईन केंद्रावरच हेलपाटे मारावे लागले असे तुपकर यांनी सांगितले. 

हेक्टरी ५0 हजार, एक लाखाची मदत द्या- राज्यात भीषण दुष्काळ असूनही दुष्काळाची घोषणा नाही. शासनाकडून उपाययोजना नाहीत. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळी मदत म्हणून जिरायतीसाठी हेक्टरी ५0  हजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे व दुष्काळाच्या योग्य ती उपाययोजना तत्काळ कराव्यात अशी मागणीही तुपकर यांनी यावेळी केली.

कर्जमाफी फसवी - राज्य शासनाने शेतकºयांना दीड लाखाची कर्जमाफी दिली.यासाठी ३४ हजार कोटींची तरतूद शासनाने केली होती.  यापैकी आतापर्यंत १६ हजार कोटींची कर्जमाफी शेतकºयांना देण्यात आली आहे. अजूनही अनेक शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टी