थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढ्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 12:34 PM2021-09-20T12:34:09+5:302021-09-20T12:42:24+5:30

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू

Swabhimani Shetkari Sanghatana's Mangalvedhya Dharne Andolan for tired Usbila | थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढ्यात धरणे आंदोलन

थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढ्यात धरणे आंदोलन

Next

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील कारखान्याकडील  शेतकऱ्यांची थकीत एफ आर पी ची  रक्कम मिळावी या मागणीसाठी व एकरकमी मिळणारी एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या कायद्याच्या विरुद्धमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

साखर  कारखानदारांनी ऊस गाळपास आल्यानंतर १४ दिवसाच्या आत एकरकमी एफ आर पी देने कायद्याने बंधनकारक आहे . दुसरा गळीत हंगाम सुरू होत  आला तरी अद्यापपर्यंत ऊस उत्पादकांना गतवर्षीचे एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. काही कारखान्यानी कायदयाचे उल्लंघन करीत  शेतकऱ्यांचे उसबिलाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या कारखानदारांवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी व  एफ. आर. पी. ची थकीत रक्कम तात्काळ जमा करण्यास भाग पाडावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले व जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली.

यावेळी श्रीमंत केदार,  दत्ता गणपाटील , दामोदर देशमुख, विजय खवतोडे, लक्ष्मण गायकवाड, नितीन नकाते, सोमनाथ बुरजे, प्रभू शिंदे, अर्जुन मुदगुल, सुनील मुढे, रवी गोवे, श्रीधर खांडेकर, ॲड भारत पवार, हणमंत भुसे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana's Mangalvedhya Dharne Andolan for tired Usbila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.