सोलापूरातील संशयास्पद मृत्यू प्रकरण ; संयुक्ताच्या शवविच्छेदनासाठी पाच डॉक्टरांची टीम तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 14:02 IST2018-09-25T13:58:06+5:302018-09-25T14:02:09+5:30

Suspected death case in Solapur; Five doctors team to prepare for postmortem cremation | सोलापूरातील संशयास्पद मृत्यू प्रकरण ; संयुक्ताच्या शवविच्छेदनासाठी पाच डॉक्टरांची टीम तयार

सोलापूरातील संशयास्पद मृत्यू प्रकरण ; संयुक्ताच्या शवविच्छेदनासाठी पाच डॉक्टरांची टीम तयार

ठळक मुद्देपोलिसांनी संयुक्ताबद्दल तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केलीपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मृत संयुक्तांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्त्वन केले

सोलापूर :  अकोलेकाटी-मार्डी मार्गावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता रमेश भैरी  (वय-२२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर)े हिच्या देहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सकाळी मृत संयुक्तांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्त्वन केले.

संयुक्ता ही सोमवारी सायंकाळी पाच वाजता अकोलेकाटी - मार्डी मार्गावरील पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आली. तिच्या संशयास्पद मृत्यूमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी कॉलेजला गेलेली संयुक्ता घरीच न आल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली तेव्हा सोलापूर तालुका पोलिसांना तिचा मृतदेह दिसून आला.

सकाळी पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान  संयुक्ताकडे  मोबाईल आणि दुचाकी नसल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान  पोलिसांनी संयुक्ताबद्दल तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केली.

Web Title: Suspected death case in Solapur; Five doctors team to prepare for postmortem cremation