शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशअण्णा जरा सबुरीनं घ्या... सोलापुरातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:17 IST

थेलियम विषबाधा प्रकरण : पोलिसांना त्यांचे काम करू द्या

ठळक मुद्दे थेलियम विषबाधा प्रकरणानंतर शहर भाजपातील अस्वस्थता कायम तत्काळ अटक न झाल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा शहरातील काही नेत्यांनी हा विषय प्रदेश पातळीवरही पोहोचविल्याने यावरून घमासान होण्याची चिन्हे

सोलापूर : थेलियम विषबाधा प्रकरणानंतर शहर भाजपातील अस्वस्थता कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नगरसेवक सुरेश पाटील यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. पोलीस त्यांचे काम करतील. तुम्ही जाहीरपणे काही बोलू नका, असेही पालकत्वाच्या नात्याने सांगितले आहे. 

थेलियम विषबाधा प्रकरणात सुरेश पाटील यांनी महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक सुनील कामाटी यांची संशयित म्हणून नावे घेतली आहेत. या सर्वांना तत्काळ अटक न झाल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या प्रकरणानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख गटातील नेते नाराज झाले आहेत तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटातील नेते चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहर भाजपातील वातावरण बिघडल्याची जाणीव दोन मंत्र्यांनाही झाली आहे. शहरातील काही नेत्यांनी हा विषय प्रदेश पातळीवरही पोहोचविल्याने यावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे सुरेश पाटील यांनी पोलिसांकडे तगादा लावला आहे. उपोषणाचा इशाराही दिला आहे. यादरम्यान, एका ज्येष्ठ नेत्याने सुरेश पाटलांकडे मंगळवारी रात्री काही माणसं पाठविली. अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार द्या म्हणत असताना लोकांची नावं घेतली. 

आता पोलिसांना त्यांचे काम करू द्या. राजकारणात असे करून चालत नाही, असे सांगितल्याचे कळते. माझा जीव गेला असता तर तुम्ही काय केले असते, असा सवाल करून पाटलांनी या माणसांना परत पाठविल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात आहे. 

मुलाला धमकी, पोलिसांकडे तक्रार -  आठ दिवसांपूर्वी मला धमकीचे दुसरे पत्र आले. मुलाच्या मोबाईलवर अर्वाच्य भाषेतील संदेश आला आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार करतोय. मी सबुरीनं घेत आलोय. माझा जीव गेला असता तर माझ्या घरच्या लोकांचे काय झाले असते, याचे उत्तर कुणाकडे आहे. प्रदेश पातळीवरूनही मला निरोप आलेला नाही. मी पोलिसांना सहकार्य करतोय. - सुरेश पाटील, नगरसेवक. 

कोठेंसह कर्मचाºयांनी नोंदविला जबाब- विषबाधा प्रकरणात बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेता महेश कोठे यांच्यासह पालिकेतील काही कर्मचाºयांनी जबाब नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आजारी पडण्यापूर्वी कोठे यांच्याकडे जेवण केल्याचा उल्लेख सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपा