शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह सुनेस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:24 PM

सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

ठळक मुद्देसाक्षीदार अन् प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वपूर्णया प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासलेयात सरकार पक्षातर्फे  अ‍ॅड.  पी. एस.जन्नू, अ‍ॅड.  एस. एस. क्यातम तर आरोपीतर्फे अ‍ॅड. आर. बी. बायस यांनी काम पाहिले

सोलापूर: वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह सुनेस जिल्हा सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोमवारी जिल्हा न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला. सिकंदर अशोक शिंदे (वय ३५ वर्षे) व राणी सिकंदर शिंदे (वय ३० वर्षे, रा. मोरवंची, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. अशोक विश्वंभर शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की,  मोरवंची (ता. मोहोळ) दि. २१ जून २०१८ रोजी ८.३० च्या सुमारास मयत अशोक विश्वंभर शिंदे यांच्या घरी अशोक शिंदे, मुलगा सिकंदर अशोक शिंदे व सून राणी सिकंदर शिंदे यांच्यामध्ये भांडण चालू होते. त्यावेळेस त्यांच्या शेजारी राहणारा अशोकचा भाऊ वसंत विश्वंभर शिंदे हा तेथे आला. त्यावेळी सून राणी हिने मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेली अ‍ॅट्रॉसिटी व अन्य केस काढून घेते म्हणून जात असताना अशोक विरोध करीत तिच्या (सुनेच्या) अंगावर धावून गेला. या प्रकाराने चिडून अशोकचा मुलगा सिकंदर चिडून माझ्या बायकोच्या अंगावर धाऊन गेला म्हणून त्याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने अशोक याच्या डोक्यात मारले. त्याचवेळी राणीनेही हातात वीट घेऊन अशोकच्या डोक्यावर फेकून मारली. दोघांच्या मारहाणीने अशोकला रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सिकंदर आणि राणी तेथून पळून गेले. 

जखमी अवस्थेतील अशोक यास त्याचा भाऊ वसंत याने रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपी सिकंदर आणि राणी यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३०२, ३४, अन्वये गुन्हा दाखल झाला, या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

यात सरकार पक्षातर्फे  अ‍ॅड.  पी. एस.जन्नू, अ‍ॅड.  एस. एस. क्यातम तर आरोपीतर्फे अ‍ॅड. आर. बी. बायस यांनी काम पाहिले. या खटल्यासाठी तपासी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व कोर्ट पैरवी म्हणून सहायक फौजदार बिराजदार यांचे सहकार्य लाभले.

साक्षीदार अन् प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वपूर्ण- या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच रासायनिक प्रयोगशाळेचा अहवालही महत्त्वाचा ठरला.  सरकारपक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना सरकारी वकील जन्नु यांनी उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे सादर केले. आरोपींनी केलेला गुन्हा हा अक्षम्य असून, त्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  दंड न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस