शास्त्रीनगरात विवाहित महिलेची आत्महत्या; प्रेत ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार
By Appasaheb.patil | Updated: January 2, 2020 14:24 IST2020-01-02T14:20:22+5:302020-01-02T14:24:04+5:30
माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला

शास्त्रीनगरात विवाहित महिलेची आत्महत्या; प्रेत ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार
सोलापूर : येथील शास्त्रीनगर फुटबॉल मैदानाजवळ राहणाºया मिनाज बाबर वळसंगकर (वय २५) या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे़ गेल्या काही महिन्यांपासून मिनाजचा पती बाबर हा माझ्या मुलीला पैशासाठी मारहाण करीत होता़ याशिवाय शाररिक व मानसिक त्रासही देत होता. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली असल्याचा आरोप मयत मिनाज चे वडील अखिल नदाफ यांनी केला आहे.
जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मयत ताब्यात घेणार नसल्याचाही पवित्रा नदाफ कुटुंबियांनी घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट दिली़ या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ शास्त्री नगरात घटनेची माहिती घेण्यासाठी बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली आहे.