साखर कारखाना - होटगीमार्गावर पथदिवे बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST2021-01-09T04:18:41+5:302021-01-09T04:18:41+5:30
मार्गावर पथदिवे बसवा सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ते होटगी दरम्यान रहदारी मोठ्या प्रमाणात असून, ...

साखर कारखाना - होटगीमार्गावर पथदिवे बसवा
मार्गावर पथदिवे बसवा
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ते होटगी दरम्यान रहदारी मोठ्या प्रमाणात असून, या मार्गावर पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या मार्गावरून सध्या उसाची आणि दूध वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. रात्रीच्या प्रसंगी कारखाना वळणावर अपघात होतात. केवळ वाहनांच्या उजेडात वाहने धावतात.
रेल्वे भुयारी मार्गातील रस्ता दुरुस्ती करा
सोलापूर : दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वे सोलापूर विभागाने सोलापूर-विजयपूर मार्गावरील गेट अनमॅन केले. हे करीत असताना त्या ठिकाणच्या वाहतुकीसाठी सिमेंट काँक्रीटचे भुयारी मार्ग उभारले. हे भुयारी मार्ग उभारले. कुमठे येथील या भुयारी मार्गात तारा सिमेंट काँक्रीटमधून बाहेर आल्याने रस्ता उखडत आहे. तसेच मजरेवाडी भुयारी मार्गात सांडपाणी थांबते. हे दोन्ही प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.