Students' crowds to see the first quality list | पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

ठळक मुद्देयंदा सोलापूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या ५९ हजार ४९ जागा कला शाखा २८६८०, विज्ञान शाखा २०९६०, वाणिज्य शाखेच्या ६९६० जागा तर संयुक्त २४४० जागा आहेत अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिध्द झाल्यामुळे लगेच प्रवेश देण्याचे काम महाविद्यालयांत सुरू

सोलापूर : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिध्द झाली़ पहिल्या यादीची उत्सुुकता विद्यार्थ्यांना होतीच, याचसोबत पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ होत होती़ यामुळे पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची परीक्षाच सुरू असल्याचे चित्र महाविद्यालयांत दिसत होते.

यंदा सोलापूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या ५९ हजार ४९ जागा आहेत़ यामध्ये कला शाखा २८६८०, विज्ञान शाखा २०९६०, वाणिज्य शाखेच्या ६९६० जागा तर संयुक्त २४४० जागा आहेत़ यंदा दहावी परीक्षेत ५५६२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यामुळे अकरावीत सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे़ अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिध्द झाल्यामुळे लगेच प्रवेश देण्याचे काम महाविद्यालयांत सुरू झाले आहे़ आता विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धावपळ करत असलेले चित्र महाविद्यालयांत दिसत होते.

मंगळवारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिध्द झाली. ही यादी पाहण्यासाठी पाल्यासोबत पालकही सकाळपासूनच महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दहावीनंतर पहिल्यांदाच कॉलेज जीवन सुरू होत असताना मुलाला चांगले शिक्षण मिळावे, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड दिसत होती.

दुसºया यादीची प्रतीक्षा!
- यंदाची गुणवत्ता यादी जास्त उंच लागल्यामुळे आम्हाला आज प्रवेश घेता आला नाही़ पहिल्या यादीत प्रवेश न मिळाल्यामुळे आता आमच्याकडे दुसरी यादी बघण्याशिवाय पर्याय नाही़ यामुळे दुसरी यादी प्रसिध्द होण्याची वाट पाहण्यासाठी गत्यंतर नाही.

मला एचएन महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा होता़ चांगली टक्केवारी असूनही माझे पहिल्या यादीत नाव आले नाही़ म्हणून मी दुसरी यादी लागण्यापर्यंत वाट पाहीऩ पण मला माझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही अशी मनात धाकधूकही आहे़ 
- खुशी जम्मा,
विद्यार्थिनी
एचएन महाविद्यालयात अल्पसंख्याकांसाठी आरक्षण असल्यामुळे जास्त टक्केवारी असूनही माझ्या मुलीला प्रवेश मिळाला नाही़ यामुळे अशा प्रकारे मिळणाºया आरक्षणाचा विचार व्हावा़ व गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावा़
- कावेरी जम्मा,
पालक 
पहिल्या यादीची मला आज खूप उत्सुकता होती़ मला चांगले गुण असूनही पहिल्या यादीपासून वंचित राहावे लागले़ पहिल्या यादीमध्ये माझे नाव दिसले नाही़ पण पुढच्या यादीमध्ये माझे नाव नक्की येईल़ मी वालचंद महाविद्यालयातच प्रवेश घेईऩ
- वैष्णवी बुरांडे, 
विद्यार्थिनी 


Web Title: Students' crowds to see the first quality list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.