शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

उभ्या ट्रकला टेम्पोने दिली धडक; दोन ठार, तिघे जखमी; मोहोळ येथील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:14 PM

मोहोळ : मार्गात उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची धडक बसून दोन ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना ...

ठळक मुद्देजखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूर येथे पाठविलेमहामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होतीवाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली

मोहोळ : मार्गात उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची धडक बसून दोन ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी २७ डिसेंबरच्या पहाटे साडेपाच वाजता सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ उड्डाण पुलावर घडली.

अली उर्फ अलाउद्दीन महामूद सुभान शेख (रा. इटकळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), चाँद बाबुलाल नदाफ (रा. लोहगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये फर्जाना चाँद नदाफ आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व जण लोहगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत. मोहोळ पोलीस व राष्ट्रीय आपदामोचन बल पाच क्रमांकाच्या वाहिनीने केलेल्या तत्काळ मदतीमुळे या तिघांचे प्राण वाचले.

 याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अली उर्फ अलाउद्दीन शेख हे आयशर टेम्पो क्रमांक (एम.एच. ४६ ए.आर. ६५१४) घेऊन सोलापूर-पुणे महामार्गावरून हैदराबादकडे निघाले होते. २७ डिसेंबरला पहाटे साडेपाच वाजता त्यांचा टेम्पो मोहोळ शहरातील उड्डाण पुलावर आला असता महामार्गाच्या ऐन मधोमध मालट्रक (एम.एच. १० झेड. ३२१३) बंद स्थितीत उभा होता. त्याला टेम्पोची पाठीमागून धडक बसल्याने टेम्पोचालक अली उर्फ अलाउद्दीन शेख जागीच ठार झाला. तर टेम्पोमध्ये बसलेले चाँद बाबुलाल नदाफ याचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस हवालदार अविनाश शिंदे, शिपाई लखन घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु आयशरची पुढील बाजू पूर्णपणे दबली होती. दरम्यान, याच मार्गावरून पुण्याहून राष्ट्रीय आपदामोचन बल क्रमांक पाच वाहिनी सुंदुबरे वाहनातील टीमने मदतीसाठी धाव घेतली आणि बचाव कार्य केले.

या अपघातात आयशर टेम्पोच्या केबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. या अपघातप्रकरणी भररस्त्यात धोकादायक स्थितीत ट्रक उभा करणाºया चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनडीआरएफ टीम धावली देवासारखी..!च्याच दरम्यान पुण्याहून राष्ट्रीय आपदामोचन बल क्रमांक पाच वाहिनी सुंदुबरे हे वाहन जात होते. अपघात झाल्याचे व बचाव कार्य सुरू असल्याचे दिसताच एनडीआरएफ टीमचे कमांडर उपनिरीक्षक बिपीन बिहारी सिंह यांनी थांबून मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या २२ सहकाºयांनी गाडीतील अत्याधुनिक कटरद्वारे काही मिनिटातच आयशर टेम्पोची बॉडी कट करून आतील सर्व जखमींसह एका सहा महिन्यांच्या व दीड वर्षाच्या अशा दोन बालकांचे प्राण वाचवले. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूर येथे पाठविले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी