सोलापुरातील शेकडो वकिलांचे कामबंद आंदोलन; बार असोसिएशनने केला ठराव
By Appasaheb.patil | Updated: October 31, 2023 15:08 IST2023-10-31T15:07:35+5:302023-10-31T15:08:12+5:30
मंगळवारी दिवसभर वकिलांनी एकत्र येत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

सोलापुरातील शेकडो वकिलांचे कामबंद आंदोलन; बार असोसिएशनने केला ठराव
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर, सर्व वकील बांधवांच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर वकिलांनी एकत्र येत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सोलापूर जिल्हयासह संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा, एस.टी. बसेस, खाजगी बसेस यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक वाहने बंद असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयात पक्षकार वकील वर्ग यांना उपस्थित राहणे अशक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात वकिल व पक्षकार हे बाहेर गावातून येत असल्याने मोठी अडचण होणार आहे, यासाठी आज मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी आरक्षणाच्या आंदोलनाच्या कारणास्तव कामापासून अलिप्त राहण्याचा शेकडो वकीलांनी ठरविले आहे, तसा ठराव देखील सोलापूर बार असोसिएशनमध्ये पारित करण्यात आला. या आंदोलनात शेकडो वकिलांनी सहभाग नोंदविला आहे.