शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सोलापूर जिल्ह्यात अद्याप एफ.आर.पी. च निश्चित नाही, साखर आयुक्त कार्यालय उत्तर देईना, कारखानदारांचे आयुक्त कार्यालयाकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:53 AM

ऊसदराबाबत एफ.आर.पी. देण्याची भाषा सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदार करीत असताना कोणत्या वर्षाच्या साखर उताºयानुसार एफ.आर.पी. दर निश्चित करायचा, हेच अद्याप साखर आयुक्त कार्यालयाने निश्चित केले नाही.

ठळक मुद्दे१५ दिवस उलटले तरी एफ.आर.पी.च निश्चित नाहीऊसदरावरुन शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्हाभर आंदोलने सुरू साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप एफ.आर.पी. च निश्चित केली नाही

अरुण बारसकरसोलापूर दि १६ : ऊसदराबाबत एफ.आर.पी. देण्याची भाषा सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदार करीत असताना कोणत्या वर्षाच्या साखर उताºयानुसार एफ.आर.पी. दर निश्चित करायचा, हेच अद्याप साखर आयुक्त कार्यालयाने निश्चित केले नाही. एकीकडे ऊस गाळपाला आणल्यानंतर १४ दिवसात शेतकºयांना पैसे दिले नाही तर कारखानदारावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे आदेश काढायचे अन् दुसरीकडे कारखाने सुरू होऊन १५ दिवस उलटले तरी एफ.आर.पी.च निश्चित करायची नाही, अशी दुहेरी भूमिका सहकार खात्याने घेतली आहे. साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या ऊसदरावरुन शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्हाभर आंदोलने सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील  यावर्षीच्या ऊसदराच्या प्रश्नासंदर्भात रविवारी पुणे येथे  सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे अध्यक्ष व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एफ.आर.पी. अधिक २०० रुपये देण्यावर चर्चा झाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सोलापूरचे कारखानदार ठाम राहिले परंतु साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप एफ.आर.पी. च निश्चित केली नाही. मागील वर्षी कोल्हापूर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील बहुतेक कारखाने उसाअभावी बंद राहिले तर सुरू झालेल्या कारखान्यांचे गाळपही दीड-दोन महिनेच चालले. अनेक साखर कारखान्यांनी ८-१० महिन्याचा ऊस गाळप केल्याने साखर उतारा  १० टक्क्यांपेक्षा कमी आहे तर जे कारखाने मागील वर्षी सुरुच झाले नव्हते परंतु यावर्षी सुरू झाले आहेत त्यांची  एफ.आर.पी. कशी ठरविणार?, असा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा मागील वर्षीचा उतारा १२ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने तेथे कायद्यानुसार दर ठरविणे सोयीचे आहे; मात्र राज्यातील अन्य सर्वच जिल्ह्यात एफ. आर.पी. निश्चित करणे गरजेचे आहे. याबाबत साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील व कार्यालयातील संबंधित अधिकारी, पुणे प्रादेशिक अधिकारी ठोस सांगत नाहीत. कारखानदार मात्र साखर आयुक्त कार्यालयाकडून अद्याप सूचना नाहीत असे सांगतात.---------------------कायदा काय सांगतो...साखर कारखान्याने मागील वर्षीच्या हंगामात केलेल्या गाळपाला जो उतारा पडतो,त्यावर एफ.आर.पी. यावर्षीच्या हंगामासाठी ठरविली जाते. ९.५० टक्के उताºयासाठी शासनाने ठराविक रक्कम एफ.आर.पी. म्हणून निश्चित केली जाते. ९.५० टक्क्यांपेक्षा वरील प्रत्येक टक्क्यासाठी आगाऊ रक्कम  देण्याबाबत शासनाने ठरवून दिलेले असते. यावर्षी एफ.आर.पी. २५५० रुपये व त्यावरील प्रत्येक एका टक्क्यासाठी २६८ रुपये देण्याचे आदेश आहेत; मात्र मागील वर्षी राज्याचे गाळप नीचांकी झाल्याने एफ. आर.पी. निश्चित समजणे कठीण आहे.------------------मागील वर्षीचा सरासरी उतारा ९.८४ टक्केमागील वर्षीचा एकट्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यातील ३८ पैकी २२ कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचा उतारा ९.८४ टक्के इतका होता.  पैकी तीन साखर कारखाने अवघे तीन-चार दिवसच चालले. सिद्धेश्वर(१०.२१), पांडुरंग(१०.५०), संत दामाजी (१०.१८),विठ्ठलराव शिंदे(१०.११) व गोकुळ शुगर्स(१०.६५) टक्के उतारा पडला होता. उर्वरित कारखान्यांपैकी काहींचा ५.९६ टक्के, काहींचा ७.०५ टक्के, ७.१४ टक्के,  ८.०१ टक्के, ८.१९ टक्के, ८.३२ टक्के,  ८.५५ टक्के उतारा होता. त्यामुळे कायद्यानुसार मागील वर्षीच्या उताºयानुसार यावर्षी दर द्यायचा की किमान ९.५० टक्के उतारा निश्चित समजायचा हे स्पष्ट केलेले नाही. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने